Tarun Bharat

कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील नियुक्त करण्यास पाकचा नकार

Advertisements

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील नेमण्यास पाकने पुन्हा नकार दिला आहे. कुलभूषण यांना केवळ स्थानिक नोंदणीकृत वकील नेमण्याची परवानगी आहे, असे पाकने म्हटले आहे. 

कुलभूषण यांना वकील नेमण्यास भारताला संधी द्या, असे निर्देश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले होते. मात्र, पाकने उच्च न्यायालयाचा हा आदेश पाळला नाही. कुलभूषण यांना भारतीय वकील द्यायचा म्हणजे पाकिस्तानच्या कायद्यात बदल करावा लागेल. त्यामुळे पाकिस्तानात कायद्याचा अभ्यास करायचा परवाना आहे, अशा वकिलांचीच कुलभूषण यांच्यासाठी नियुक्ती करता येईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हफीज चौधरी यांनी म्हटले आहे. 

हेरगिरी आणि दहशतवादाच्याआरोपाखाली कुलभूषण हे पाकिस्तानमध्ये अटकेत असून, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्यांना एप्रिल 2017 मध्ये ही शिक्षा सुनावली आहे.

Related Stories

युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क यादीत श्रीनगर सामील

Patil_p

SBI चे गृहकर्ज महागले

datta jadhav

केरळ : पायलटच्या सतर्कतेमुळे बचावले 104 प्रवाशी

datta jadhav

”देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये”

Abhijeet Shinde

कोरोना प्रभावित क्षेत्रासाठी 1.1 लाख कोटी

datta jadhav

बेंगळूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या घरावर जमावाचा हल्ला; 2 ठार

datta jadhav
error: Content is protected !!