Tarun Bharat

कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील अध्यादेशाची मुदत चार महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. या अध्यादेशानुसार जाधव यांना त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मे महिन्यात जारी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुनरावलोकन न्यायालयाच्या (पुनरावलोकन आणि पुनर्विचार) अध्यादेशाची मुदत 17 सप्टेंबर रोजी संपणार होती. परंतु, कौमी विधानसभेने त्याला सोमवारी चार महिन्यांची मुदतवाढ दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हा अध्यादेश आणण्यात आला. ज्यात पाकिस्तानला लष्करी न्यायालयाने जाधव यांना दिलेल्या शिक्षेचा प्रभावी आढावा घेण्यास सांगण्यात आले.

जाधव यांच्याबाजूने कोर्टात प्रतिनिधित्व करण्यासाठी वकील नेमण्याची विनंती पाक सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने 3 सप्टेंबर रोजी पाक सरकारला जाधव यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वकील नेमण्याची आणखी एक संधी देण्याचे निर्देश दिले होते. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने म्हटले होते की, न्यायालयाने भारताला न्यायालयीन आदेश कळवले होते, पण भारताने प्रतिसाद दिला नाही.

हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण हे पाकिस्तानमध्ये अटकेत असून, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्यांना एप्रिल 2017 मध्ये ही शिक्षा सुनावली आहे. 

Related Stories

मुलाच्या उंचीमुळे बदलले घराचे छत

Patil_p

पुतिन यांच्या स्थानी त्यांचा स्वयंपाकी येणार?

Patil_p

म्यानमारमध्ये आंग सान सू की यांना 4 वर्षांची शिक्षा

Patil_p

पाकिस्तानने लाँच केली स्वदेशी कोरोना लस

datta jadhav

अध्यक्ष झाल्यास पाकिस्तानची मदत बंद

Patil_p

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी मावशीला जिवंत जाळले

datta jadhav
error: Content is protected !!