Tarun Bharat

कुलभूषण प्रकरणी भारताला वकील नेमण्याची संधी

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला पुन्हा एकदा झटका बसला आहे.  कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याची आणखी एक संधी भारताला मिळायला हवी, असे न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पाकिस्तानकडून या अगोदर भारतीय वकील नियुक्त करण्यास नकार देण्यात आलेला होता. आतापर्यंत कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडावे लागले होते. आता इस्लामाबाद उच्च न्यायालयानेच पाकिस्तान सरकारला या प्रकरणी धक्का दिल्याचे दिसत आहे.

 पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी कुलभूषण जाधव प्रकरणी आम्ही राजकीय माध्यामातून पाकिस्तानच्या संपर्कात आहोत. सरकार कुलभूषण जाधव यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शक्मय ते सर्व पावले उचलत असल्याचे सांगितले आहे. कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोटय़ा आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानुसार, कौन्सेलर ऍक्सेस तसेच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे.

Related Stories

एसटी महामंडळाला शासनाची 600 कोटींची मदत

datta jadhav

करुळ घाटात संरक्षक कठडा ढासळला, घाट २६ जूलै पर्यंत बंद

Archana Banage

आजारपणावर टीका करणे ही राजकीय प्रगल्भता नाही…

datta jadhav

नामांतराचा वाद पेटणार; G-20 परिषदेदरम्यान जलील यांचा आंदोलनाचा इशारा

datta jadhav

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Abhijeet Khandekar

सावत्र आई बापाकडुन बालीकेचा खुन, दोघांना अटक

Archana Banage