Tarun Bharat

कुळे जलशुद्धिकरण प्रकल्पाचा लवकरच शिलान्यास

बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती : शिगाव येथे पंप, जेकव्हेलचे उद्घाटन

प्रतिनिधी / धारबांदोडा

मेटवाडा-कुळे येथे अंदाजे रु. 24 कोटी खर्चून उभारण्यात येणाऱया जलशुद्धिकरण प्रकल्पाची निविदा निघाली असून लवकरच या प्रकल्पाचा शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्याहस्ते होणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कुळे व मोले पंचायत क्षेत्रातील पाण्याची समस्य कायमची दूर होणार आहे, अशी माहिती स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली.

कुळे पंचायत क्षेत्रातील वाकीकुळण शिगांव येथे जेकव्हेल, पंप व प्रेशर फिल्टरचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री पाऊसकर बोलत होते. अंदाजे रु. 30 लाख खर्चून ही पंपयंत्रणा उभारण्यात आली आहे. दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती व अन्य साधनसुविधांसाठी निविदा निघाल्या आहेत, असेही त्यांनी पुढे बेलताना सांगितले. वाकीकुळण येथे पिण्याच्या पाण्याची समस्या होती, ती दूर होणार असून या प्रकल्पामुळे संपूर्ण वाडय़ावर सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. गरज भासल्यास आसपासच्या भागातही या जेकव्हेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करता येईल, असेही त्यांनी सांगितले. बांधकाम खात्यामध्ये लवकरच नोकर भरती होणार असून कामगार सोसायटीमध्ये तंत्रज्ञाची भरती केली जाईल. त्यात स्थानिकांना प्राधान्य देणार असल्याचे मंत्री पाऊसकर म्हणाले. यावेळी उपसरपंच खुशी वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर, पंचसदस्य निलेश सातपालकर, आरुषी सावंत, मच्छिंद्र देसाई, निशा शिंगावकर, नंदीश देसाई, सहाय्यक अभियंते देविदास गावडे, शैलेंद्र बाबशेट, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, खुशाली मामलेकर व अन्य नागरिक उपस्थित होते. खुशाली मामलेकर यांनी प्रकल्पासाठी जमिन दिल्याने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला याबद्दल मंत्री पाऊसकर यांनी त्यांचा खास उल्लेख केला. सुधा गावकर म्हणाल्या, पाच वर्षांपूर्वी सावर्डे मतदार संघातील बऱयाच गावांमध्ये पिण्याच्या पाण्यची समस्या होती. मात्र दीपक पाऊसकर हे बांधकाममंत्री बनल्यानंतर बहुतेक गावांमध्ये पाणी व चांगल्या रस्त्यांची सोय झाली आहे. खुशी वेळीप यांनी आपल्या प्रभागातील अनेक वर्षांची पाण्याची समस्या सुटल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कुळे शिगाव पंचायत क्षेत्रात मंत्री पाऊसकर यांच्या कारकिर्दित शंभर कोटींची कामे झाल्याचे मच्छिंद्र देसाई यांनी सांगितले.

Related Stories

खनिज वाहतुकीमुळे मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड

Omkar B

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Abhijeet Khandekar

चोर्ला घाटात दरड कोसळली

Omkar B

राष्ट्रीय दुखवटा…

Patil_p

ऑन लाईन फसवणूकप्रकरणी पोलीस कोठडी

Patil_p

पणजी मनपाचा अर्थसंकल्प आज

tarunbharat