Tarun Bharat

कुस्तीगीर परिषदेच्यावतीने प्रशिक्षकांना ऑनलाईन वेबीनार सुरू होणार

पैलवान, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांच्याकरिता फायदेशीर उपक्रम

वार्ताहर / औंध

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे तालमी बंद आहेत. त्यामुळे पैलवान कुस्तीपासून दूर आहेत. मात्र ते कुस्तीच्या प्रवाहात सामील व्हावेत कुस्ती प्रशिक्षणाचे अद्ययावत ज्ञान त्यांच्या पर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्यावतीने ऑनलाईन वेबीनार लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती. परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी दिली. 

कुस्ती प्रशिक्षकांसाठी ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कुस्ती प्रशिक्षक, शालेय क्रीडाशिक्षक, पैलवान, वस्ताद यांच्यापर्यंत कुस्ती प्रशिक्षणाचे आधुनिक ज्ञान पोहोचवण्याच्या द्रुष्टीने महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेने अध्यक्ष खा. शरद पवार सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हे  या उपक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक 
उत्तमराव पाटील मार्गदर्शन करणार आहेत. कुस्तिगीर परिषदेच्या वतीने होणाऱ्या अधिकृत व आणि मोफत  प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी वेबीनार प्रमुख उत्तमराव पाटील, कार्यलयीन सचिव ललित लांडगे, शेखर शिंदे यांच्याशी संपर्क साधून सात ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करावी. हे वेबीनार सर्वांसाठी मोफत आहे. परंतु परिषदेकडे नाव नोंदणी करून रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच यामध्ये सहभागी होता येईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तरी इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव शेखर शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

दुधबंद आंदोलन : संकलित दुधापासून तयार केली बासुंदी ; वृद्धाश्रमात वाटप

Archana Banage

Photo : सत्ता,पैसा,गुंडगिरी,धमक्या आणि दबावाला टाचाखाली चिरडत ‘मविआ’ने विजय मिळवला-रोहित पवार

Archana Banage

दहावी बोर्डाचे फॉर्म 11 जानेवारीपर्यंत भरण्याचे शाळांचे आवाहन

datta jadhav

विसर्जनासाठी प्रत्येक वॉर्डात हौद

Patil_p

ऐतिहासिक लामणदिव्याची चोरी

Patil_p

अल्पवयीन युवतीवर अत्याचार; सावत्र पित्यास अटक

Patil_p