Tarun Bharat

कुस्तीच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून निधी द्या – अभिनेत्री दीपाली सय्यद

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्यातील कुस्तीच्या विकासासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून निधी द्यावा, अशी मागणी अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांनी केली आहे. पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सोमवारी कोल्हापूर दौऱयावर आले होते. त्याचवेळी कोल्हापुरात आलेल्या दीपाली सय्यद यांनी मंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील कुस्तीची स्थिती, पैलवानांच्या अपेक्षा आणि मागण्या आणि कुस्ती मैदानाविषयी निवेदन देवून चर्चा केली.

दीपाली भोसले सय्यद कुस्तीगीर फाऊंडेशनच्या माध्यमातून सय्यद कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी अनेकांना भरीव मदत केली. तसेच पैलवानांनाही सहाय्य केले होते. कोरोनाच्या संकट काळात कुस्तीची मैदाने, स्पर्धा बंद असल्याने कुस्ती आणि पैलवानांची झालेली स्थिती याविषयी सय्यद यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने बंद असलेल्या महाराष्ट्र केसरी व इतर स्पर्धा घेण्याची विनंती केली होती. पवार यांनी परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्याशी संपर्क करून त्यांना सूचना दिल्या होत्या.

कोल्हापुरात आदित्य ठाकरे यांची भेट

सोमवारी दीपाली सय्यद कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांनी विजयी गंगावेस तालमीला भेट देवून तेथील मल्लांशी चर्चा केली होती. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्याच दिवशी पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही कोल्हापूर दौऱयावर होते. त्यांची भेट घेऊन सय्यद यांनी निवेदन सादर केले. तसेच कुस्तीविषयी चर्चाही केली. कुस्तीला पर्यटन विभागाच्या माध्यमातून निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

खासबाग मैदानालाही निधी द्या

राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी कुस्तीसाठी उभारलेल्या खासबाग कुस्ती मैदानाची दूरवस्था झाली असून विकासासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणीही दीपाली सय्यद यांनी मंत्री ठाकरे यांच्याकडे केली.

Related Stories

कराडमध्ये डबल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई

Patil_p

सोलापूर : उपरी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Archana Banage

आदित्य ठाकरेंच्या बुलढाण्यातील सभेला परवानगी नाकारली

datta jadhav

बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

Archana Banage

कोल्हापूर : तीन हजाराची लाच स्विकारताना कॉन्स्टेबलसह होमगार्ड जेरबंद

Archana Banage

जांभळी येथे राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रित पुरुष कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

Archana Banage