Tarun Bharat

कूल कूल ऑरेंज मिस्टिक

उन्हाळ्यात कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा आरोग्यदायी आणि चविष्ट अशी पेयं बनवता येतील. ही पेयं घरी आलेल्या पाहुण्यांनाही खूप आवडतील. या पेयांमुळे कडक उन्हातही  ताजेपणाची अनुभूती मिळेल. चला तर मग ऑरेंज मिस्टिक ही रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य : आंब्याचा रस दोन कप, एक चमचा लिंबाचा रस, संत्र्याचा रस अर्धा कप, एका लिंबाचे पातळ काप(स्लाईस) करून घ्या. पुदिन्याची दहा ते बारा पानं, आईस क्यूब्ज

कृती : हे पेयं तयार करण्यासाठी ग्लास थंड करून घ्या. मग ग्लासमध्ये आधी आईस क्यूब्ज, लिंबाचे काप, पुदिन्याची तीन-चार  पानं आणि लिंबाचा रस घाला. मग त्यात आंबा आणि संत्र्याचा रस घाला. या पेयामध्ये भिजवलेले चिया सीड्स किंवा सब्जाही घालता येईल. पेय तयार झाल्यावर सजावटीसाठी पुदिन्याची पानं घाला. आवडत असल्यास चेरीही घालता येईल. हे थंड थंड कूल कूल पेयं प्रत्येकाला खूप आवडेल आणि काहीतरी वेगळं प्यायल्याचं समाधानही मिळेल.

Related Stories

बेळगावमधील हॉटेल्सना १ लाख १४ हजार रुपये दंड

Sandeep Gawade

चटपटीत पनीर बॉल्स

tarunbharat

Dryfruit : मेंदूच्या आरोग्यासाठी रोज खा हे ड्रायफ्रुट्स

Abhijeet Khandekar

मुळा बेसन

Omkar B

किस्पी ब्राऊन बन्स

Omkar B

टोमॅटो ग्रेव्ही

tarunbharat