Tarun Bharat

कृषीमंत्री पाटील यांनी सिध्दरामय्यांवर साधला निशाणा

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कृषीमंत्री बी.सी. पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आरोपाचे खंडन करत, केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे म्हणाले.

कृषीमंत्री म्हणाले की प्रत्येक सरकार केवळ शासनास प्राप्त झालेल्या महसुलातून विकास योजना राबवते. कोणताही नेता आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेतून अशा योजना चालवित नाही. सिद्धरामय्या यांच्या अण्णाभाग्य योजनेचे वैयक्तिकरित्या क्रेडिट घेणे योग्य नाही. या योजनेंतर्गत ७ किलो तांदूळ वाटप केल्याचा विरोधी पक्षनेत्याचा दावा खोटा आहे.

दरम्यान किसान सन्मान योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकार १ कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात निधी जमा करीत आहेत? ही कल्याणकारी योजना नाही का? कोरोना साथीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने सामान्य लोकांना मदत केली नाही का? किमान आधारभूत किंमतीवर कृषी उत्पादने खरेदी केली जात नाहीत? केवळ २ किलो तांदळाच्या कपातीवरून सरकारला घेराव घालणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

Related Stories

देशातील ‘या’ राज्यात जुन्या वाहनांची संख्या सर्वाधिक

Archana Banage

बेंगळूरमध्ये दर तासाला ७०० जण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

केएसआरटीसीने केले आसन व्यवस्थेत बदल

Archana Banage

कर्नाटक : कोरोना चाचण्या वेगाने होण्याची गरज : राज्यपाल

Archana Banage

कर्नाटक: मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना म्हैसूर विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान

Archana Banage

बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोजक्या शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांचा काळा दिन

Archana Banage
error: Content is protected !!