Tarun Bharat

कृषी उत्पादित मालावर निर्बंध नाहीत

Advertisements

वार्ताहर/ विजापूर

 शेतकऱयाला लॉकडाऊनमुळे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हय़ातील सर्व कृषी अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. शेतकऱयांना देण्यात येणारी बी-बियाणे व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची खरेदी वेळेत करा, अशी सूचना कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी केली आहे. त्यांची अडवणूक कोणत्याही परिस्थितीत करू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कृषी, फलोत्पादन, पशू संगोपन, एपीएमसी, मत्स्यालयसह विविध खात्याच्या अधिकाऱयांबरोबर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱयांना लागणारी बी-बियाणे, खते, कीटकनाशक औषधे उपलब्ध करून द्या. खरेदी करताना त्यांना कोणताही त्रास होता कामा नये, असे मंत्र्यांनी सांगितले. शेतकऱयांच्या कोणत्याही वाहनाला अडवू नये. त्यांचा माल खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

 सर्व बी-बियाणे व खते उपलब्ध करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे सांगून 40 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध केली जातील, असे सांगितले. द्राक्ष उत्पादकांना ऑनलाईन व्यापार करण्यास बंदी घातली आहे. तसेच द्राक्षासाठी विजापूर व बागलकोटमध्ये 2850 टन संग्रह करण्यासाठी शितगृहे आहेत. ही सेवा मोफत आहे. वाइनरी उत्पादनासाठी कुठलेही निर्बंध नाहीत.

चिकन खाल्ल्यास काहीच होणार नाही

कोरोना हा आजार चिकन खाल्ल्यामुळे होतो असा गैरसमज पसरविण्यात आला आहे. मात्र चिकन खाल्ल्याने असा कोणताच आजार होत नाही. तेव्हा मनात कोणतीही शंका न बाळगता चिकन खाऊ शकता, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. या बैठकीला आमदार सोमनगौडा पाटील सासनूर, देवानंद चव्हाण, विधान परिषद सदस्य अरूण शहापूर, जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील, जिल्हा पोलीस  प्रमुख अनुपम अगरवाल, जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी गोविंद रेड्डी, आमदार शिवानंद पाटील, बसनगौडा पाटील-यत्नाळ उपस्थित होते.

Related Stories

कुटुंबियांनी घेतली विनय कुलकर्णी यांची भेट

Patil_p

येळ्ळूरमधील एकाला कोरोनाची लागण

Patil_p

ऐन दिवाळीतच कचऱयाची दुर्गंधी

Patil_p

‘घरकुल 2022’ची मुहूर्तमेढ

Patil_p

‘हुक्केरी’त 62 हजार हेक्टरमध्ये पेरणी

Patil_p

अखेर बसवाण गल्लीतील डेनेजवाहिन्या बदलल्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!