Tarun Bharat

कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल कबनूरात साखर वाटप व आनंदोत्सव

Advertisements

कबनूर / प्रतिनिधी

केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या साठी मंजूर केलेले तीन शेती विधेयके मागे घेतले चे जाहीर केल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू ठेवलेल्या लढ्याला अखेर यश आल्याच्यानिमित्त कबनूर चौकात भाजप वगळता सर्व संघटना व पक्षाच्यावतीने साखर वाटप व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

केंद्र शासनाने तीन कृषी कायदे आणले त्याविरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आवाज उठवून लढा सुरू केला अनेक शेतकरी हुतात्मे झाले. तरीदेखील शासनाला जाग आली नाही अखेरीस शासनाने हे तिन्ही विधेयके मागे घेण्यात भाग पाडले व केंद्र शासनाने तिन्ही कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले. अखिल भारतीय किसान सभेच्या या लढ्याला अखेरीस यश आल्यामुळे आज सकाळी येथील मुख्य चौकात भाजपा वगळता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासह मित्र पक्ष व विविध संघटनेच्या वतीने चौकात एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी केंद्र शासनावर कडाडून टीका केली.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या साठी केलेले तीन कायदे मागे घेतले हे किसान सभेचे मोठे यश म्हणावे लागेल असे मत कॉम्रेड आनंदराव चव्हाण व्यक्त केले. यावेळी, महावीर लिगाडे, माजी सरपंच उदय गीते, धूळ गोंडा पाटील, अल्ताफ मुजावर यांची भाषणे झाली. त्यानंतर साखर वाटप करण्यात येऊन फटाके फोडली. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड आनंदराव चव्हाण ,बंडा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावीर लीगाडे, एम एस पाटील, धुलगौंडा पाटील,, राष्ट्रीय काँग्रेसचे उदय गीते, रियाज चिकोडे, अल्ताफ मुजावर, पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Stories

कोल्हापूर : नेसरीचा सीमोल्लंघन सोहळा रद्द

Abhijeet Shinde

जिल्ह्यात कोरोनाचे नवे पाच रुग्ण

Abhijeet Shinde

लहान भावाच्या निधनाचे वृत्त समजताच मोठ्या भावानेही सोडला प्राण!

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात महिलेसह तिघांचा कोरोनाने मृत्यू

Abhijeet Shinde

सरकारी दवाखान्यात दिव्यांग सेवा केंद्र चालु करणासाठी प्रयत्न करणार

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांच्या प्रलंबित कामांचा त्वरीत निपटारा करण्याची शिवसेनेची महाराष्ट्र बँकेकडे मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!