Tarun Bharat

कृष्णाकाठच्या पुरातन स्वयंभू गणेश मंदिराची आकर्षक सजावट

Advertisements

 प्रतिनिधी  / कुरुंदवाड 

   आज माघ शुद्ध तृतीया अर्थात ‘गणेश जयंती’ यानिमित्त शिरोळ तालुक्यातील गणेश वाडी येथील कृष्णा नदीकाठावर पूर्वाभिमुख असलेल्या ‘स्वयंभू गणेश मंदिरा’त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यानिमित्त इथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कृष्णाकाठच्या संस्थानकालीन गणेश वाडी येथे पुरातन असे ‘स्वयंभू गणेश मंदिर’ आहे. आज माघी उत्सव अर्थात गणेश जयंतीनिमित्त या पुरातन मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे त्याचबरोबर दर संकष्टीला पायी वारी करणाऱ्या गणेश भक्तांकडून या गणेश जयंतीनिमित्त येथील मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अंगारक योगावर आजची गणेश जयंती आल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यानिमित्त पहाटे साडेपाच वाजता नित्यपूजा, सकाळी आठ वाजता अभिषेक, नऊ वाजता संकल्प एकादशनी व श्रींची अलंकारीत महापूजा, सकाळी अकरा वाजता जन्म काळाचे ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन आणि त्यानंतर दुपारी ठीक 12.39 वाजता श्रींचा जन्म सोहळा पार पडला. यानंतर चांदीच्या पाळण्यात श्रींची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती. यावेळी पारंपारिक आरत्या व पाळणा गीते म्हणण्यात आली. सायंकाळी पाच वाजता भजन व रात्री सात नंतर मंत्रपुष्प आरती असे नित्य कार्यक्रम असून आज गणेश जयंतीनिमित्त मंदिरातील श्री गणेशाची अलंकारिक पूजा येथील तरुण पुजारी अमोघ काणे यांनी आकर्षकरित्या बांधली आहे.

दरम्यान नृसिंहवाडी आणि परिसरातून प्रत्यक संकष्टीला गणेश भक्त पायी दर्शनासाठी गणेश वाडीला येतात या भक्तांनी आज गणेश जयंतीनिमित्त पुरातन गणेश मंदिराची आकर्षक विविधरंगी फुलांनी सजावट केल्याने हा परिसर आज अधिकच खुलून दिसत आहे.

 

Related Stories

इचलकरंजीत वर्षापासून अर्धवट राहिलेल्या रस्त्याचा केक कापून वाढदिवस

Abhijeet Shinde

पीपीई किट व थर्मल टेस्टिंग मशीन खरेदी करणारी धरणगुत्ती पहीलीच ग्रामपंचायत

Abhijeet Shinde

कुडित्रेच्या यशवंत बँकेची राष्ट्रीय पातळीवरील बँको पुरस्कारासाठी निवड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : प्रदेश काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Abhijeet Shinde

कुष्ठरोग विसरू नका…!

Sumit Tambekar

नियमांचा अतिरेक करणाऱ्या पोलिसांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!