Tarun Bharat

कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचे पथक रवाना

प्रतिनिधी / मिरज

कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचे तज्ञ अधिकारी व कर्मचारी यांचे पथक रवाना झाले आहे.1 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या काळात अर्जुनवाडपासून अलमट्टी धरणापर्यंत सदरचे पथक कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजणार आहे. भारतातील सर्वच नद्यांवर केंद्रीय जल आयोगाची केंद्रे आहेत.

2005 व 2019 च्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रमध्ये महापुराचा हाहाकार माजला होता. त्या दृष्टीने नदीची खोली व रुंदीचे मोजमाप अंत्यत महत्वाचे आहे. या मोजमाप करण्याच्या तज्ञ पथकामध्ये प्रमुख कनिष्ठ अभियंता रुपेश कुमार यादव, कुरुंदवाडचे वर्क सरकार एन. जी. हिपिरे, अर्जुनवाडचे कुशल कार्य सहाय्यक उद्धव मगदूम, टाकवड्याचे एम. बी. कांबळे, नेज चे प्रकाश कुंभार, समडोळ चे माणिक चोगुले, एम. आर. नलवडे आणि चालक हरीश पवार यांचा या पथकामध्ये समावेश आहे.

Related Stories

तासगावात एकाच दिवशी 36 रुग्ण कोरोनाबाधित

Archana Banage

सांगलीत कोरोनाचा सोळावा बळी, नवे २८ रूग्ण

Archana Banage

दहावी, बारावी परिक्षेची सर्व तयारी पूर्ण

Archana Banage

Sangli; मिरजेत तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Abhijeet Khandekar

सांगली : लवकरात लवकर सांगली-मिरज जिल्हा रुग्णालये “महालॅब’ला जोडण्यात यावी – आ. सुधीर गाडगीळ

Archana Banage

सांगलीत सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

Archana Banage