प्रतिनिधी /सांगली
शहरातील स्वामी समर्थ घाट येथे एका 50 ते 52 वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही महिला आंघोळीसाठी नदीत उतरली होती. दरम्यान तिचा पाय घसरून ती बुडाली असावी असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. घटना आज, शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.
या महिलेचा मृतदेह वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला आहे त्याचा प्राथमिक तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे हे करत आहे. या महिलेची अद्यापही ओळख पटली नाही . या महिलेबाबत कोणास माहीती असल्यास त्यानी सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

