Tarun Bharat

कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

Advertisements

प्रतिनिधी / कुरुंदवाड

गेल्या चोवीस तासात राधानगरी आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात व शिरोळ तालुक्यात हवामान अंदाजानुसार जोरदार पाऊस झाल्याने शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

गेल्या बारा तासात तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत नऊ फुटाने वाढ झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमावर असलेल्या संगमेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे तर कुरुंदवाड जवळील जुन्या कुरुंदवाड शिरोळ मार्गावरील अनवडी नदीचा छोटा पूल पाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यातून पुढे कृष्णा नदीत आज 15 हजार 300 क्यू सी एक्स विसर्ग सुरू आहे तर कुरुंदवाड घाट येथून पुढे 23 हजार 372 क्यूसेक्स इतका विसर्ग पुढे सुरू असून येथे पाण्याची पातळी 21 फूट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान कृष्णा नदीवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटच्या राजापूर बंधारा येथे आज दुपारी चार वाजता 15 फूट 6 इंच उंची नोंद घेण्यात आली असून येथील धरणाच्या 65 दरवाजातून पुढे 23 हजार 470 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी झपाट्याने वाढत राहिली तर हा राजापूर बंधारा पाण्याखाली जाणार आहे.

दरम्यान आज सकाळी काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली असली तरी दुपारी एक नंतर चार वाजेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यानंतर वातावरण ढगाळ होते व रात्री उशिरा पर्यंत अजून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने १२ बळी, ५९१ नवे रुग्ण

Archana Banage

शिवराज्याभिषेक दिनी आनंदाची बातमी! रायगडावर सापडली ‘बा’ रायगड टीमला स्वराज्याची दौलत

Rahul Gadkar

कोल्हापूर : अमित राठोड खून प्रकरणी दोघा संशयिताना अटक

Archana Banage

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक- राजेश टोपे

Archana Banage

शिवाजी चौकातील नवसाला पावणाऱ्या महागणपतीचे विसर्जन

Archana Banage

रेल्वे,एस.टी बसस्थानकाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय करा

Archana Banage
error: Content is protected !!