Tarun Bharat

कृष्णा-मलप्रभा नदीवर धोकादायक पाणीपातळी दाखविणारी यंत्रणा

प्रतिनिधी/ बेळगाव

पावसाळय़ात रेल्वेपुलांवरील पाण्याची पातळी वाढत असते. त्याची माहिती समजावी, याकरिता रेल्वे विभागाने कृष्णा व मलप्रभा नदीवर आधुनिक यंत्रणा बसविली आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढताच त्याची माहिती रेल्वे विभागाला समजणार आहे.

लेंढा-मिरज मार्गावरील मलप्रभा नदीवर गुंजी ते खानापूर दरम्यान तर कृष्णा नदीवर कुडची ते उगार खुर्द दरम्यान ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाणी वाढताच सायरन वाजून धोक्मयाची घंटा वाजणार आहे. त्याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून रेल्वेला मिळणार आहे. इंटेलिजंट रिव्हर लेव्हल मॉनिटरींग  एन्स्ट्रूमेंट या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

या ठिकाणी तंत्रज्ञानाला वीजपुरवठा करणे शक्मय नसल्याने सौरउर्जेचा वापर करण्यात आला आहे. अंदाजे 10 लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी विजय अगरवाल व कौशलकिशोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मागीलवषी मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कृष्णा नदीने धोक्मयाची पातळी ओलांडली होती. त्यामुळे ही यंत्रणा यावषी उभारण्यात आली आहे.

Related Stories

ऍड.यशोदा पाटील यांची न्यायाधीशपदी नियुक्ती

Amit Kulkarni

आम्हाला संरक्षण द्या, आशा कार्यकर्त्यांचे निवेदन

Patil_p

थेट बांधावरच अधिकाऱयांचे शेतकऱयांना मार्गदर्शन

Patil_p

द्राक्ष व्यावसायिकाची ऑनलाईनद्वारे फसवणूक

Amit Kulkarni

सरकारी वकील पदाच्या परीक्षा पुन्हा घ्या

Rohit Salunke

नियमित अन् वाढीव वेतन द्या

Amit Kulkarni