Tarun Bharat

कृष्णा योजनेच्या पाईप लाईनला गळती

शिरढोन/वार्ताहर

शिरढोन कुरुंदवाड मार्गावर आज पुन्हा इचलकरंजी कृष्णा योजनेच्या पाईप लाईन ला मोठया प्रमाणात गळती लागली आहे.गळतीचे पाणी प्रचंड दाबाने मुख्य रस्त्यावरून पलीकडे पडल्याने जवळपास 1 तास या मार्गावर वाहतूक ठप्प होती.त्यामुळे
1किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.दरम्यान शिरढोन येथील तरुणांनी इचलकरंजी पाणी पुरवठ्याचे अधिकारी शिवाजी कांबळे यांना माहिती सांगून पाणी पुरवठा बंद केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

या मार्गावर शिरढोन पंचगंगा नदी पुलाजवळ मुख्य रस्त्याला लागून बस्तवाड ते इचलकरंजी येथे कृष्णा योजनाची पाईप लाईन टाकण्यात आली आहे .मात्र जवळ पास योजनेच्या प्रारंभापासून च गळतीचे ग्रहण कायम सुरू आहे.चार दिवसापूर्वी याच मार्गावर गळती अद्याप निघाली नसताना गुरुवारी पुन्हा नदी पुलाजवळ मोठी गळती लागले.विशेष म्हणजे गळतीमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याला इतका दाब होता की पाईप लाईन ला लागून असलेला भराव तुटून पाण्याच्या प्रवाहाबरोबर उडून जात होता.त्यामुळे वाहन धारकांनी जागेवरच थांबणे पसंद केले.त्यामुळे काही तास वाहतूक ठप्प होती. इनपा पाणीपुरवठा विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने येथील नागरिक व वाहन धारकातून प्रचंड संताप व्यक्त होत होता.दरम्यान गळतीच्या पाण्यामुळे येथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे त्वरित गळती काढून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे अशी मागणी जोर धरत आहे.

Related Stories

साखर दरासंदर्भात लवकरच पंतप्रधानांना भेटणार : शरद पवार

Archana Banage

माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय पातळीवर जी.आय.मानांकनासाठी हालचाली

Abhijeet Khandekar

सुतारवाडय़ावर दरवर्षीच स्थलांतराची वेळ

Kalyani Amanagi

कुणीही जिंकले तरी खासदारकी कोल्हापुरातच!

Archana Banage

ज्येष्ठांना वेळेत औषध देणारे उपकरण तयार

Archana Banage

बोंडले येथील तरुण उजनी कालव्याच्या पाण्यात बेपत्ता

Archana Banage