Tarun Bharat

कृष्णा सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळ्यास प्रारंभ

प्रतिनिधी/ कराड

 कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची मुख्य अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाया कृष्णा सहकारी बँकेने आज सुवर्णमहोत्सवी म्हणजेच 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे. बँकेचे मार्गदर्शक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि श्री. विनायक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.

          ग्रामीण भागातील शेतकयांना अर्थपुरवठा करण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी 12 नोव्हेंबर 1971 रोजी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. या बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगला पतपुरवठा होऊ लागला. तसेच लोकांच्या ठेवीला सुरक्षितता लाभली. पुढे डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात बँकेला सहकार क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवून दिले. सध्या चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा मोठा विस्तार झाला असून, सातारा, सांगली, कोल्हापूरसह पुणे जिह्यात बँकेच्या एकूण 18 शाखा कार्यरत आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय 626 कोटी रूपयांहून अधिक असून, निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के आहे.

          सहकारी आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान देणाया कृष्णा बँकेने आज 50 व्या वर्षात पदार्पण केले. डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, हेमंत पाटील, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय चोरगे, बँकेचे व्यवस्थापक भगवानराव जाधव, जी. बी. वाटेगावकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

रामजन्मभूमी निधी संकलन अभियानाला मदत

Patil_p

मटका अड्डय़ांवर छापे टाकून चौघांना अटक

Patil_p

थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि…, आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान

Archana Banage

सातारा शहरात कोरोनाचा उद्रेक

Patil_p

सातारा : जिल्ह्यात २४ तासात सरासरी ४२.१४ मि.मी. पाऊस

Archana Banage

धक्कादायक : वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग

Tousif Mujawar