Tarun Bharat

कृष्णा स्पिच थेरपीतर्फे उद्या कान-वाचा मोफत तपासणी शिबिर

प्रतिनिधी /बेळगाव

कृष्णा स्पिच थेरपी आणि हिअरिंग क्लिनिक यांच्या ऑडिओलॉजी विभागामार्फत डॉक्टर्स डे चे औचित्य साधून ऑडिओलॉजिस्ट तज्ञांकडून कानाच्या मोफत तपासण्या करण्यात येणार आहेत. दि. 1 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे. काकतीवेस रोड येथील प्रसाद मेडिकलसमोर व शारदा जम्बो झेरॉक्सच्या शेजारी असणाऱया क्लिनिकमध्ये हे शिबिर घेतले जाणार आहे.

ज्या रुग्णांना ऐकण्यासंबंधी तीव्र ते अति तीव्र प्रकारचा श्रवण दोष व त्याहीपेक्षा जास्त श्रवणदोष आढळून आल्यास अशा रुग्णांना श्रवण यंत्रांची गरज असू शकते पण सामान्य रुग्णांना नामांकित कंपनीचे महागडे श्रवणयंत्र घेणे शक्मय होत नाही. म्हणून या एकदिवसीय शिबिरामध्ये गरजू रुग्णांना कमीत कमी दरामध्ये नामांकित कंपन्यांचे श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिराला भेट देणाऱया रुग्णांना सर्व प्रकारच्या ऐकण्यासंबंधीच्या चाचण्या निशुल्क केल्या जाणार आहेत. ज्या रुग्णांना बोलण्यासंबंधीच्या समस्या आहेत. त्यांना या शिबिरामध्ये वाचा उपचार तज्ञांकडून मोफत स्पिच थेरपी दिली जाणार असून, मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. तसेच ज्या रुग्णांच्या श्रवण यंत्रात दोष आहे त्या श्रवण यंत्रांचे सुटे भाग माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी 9492853815 किंवा 8088559289 यावर संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापकांनी केले आहे.

Related Stories

रमाकांत कोंडुस्कर यांचा विविध भागात होणार प्रचार

Amit Kulkarni

वसाहत योजना राबविण्यास बुडा अपयशी

Amit Kulkarni

दोन दिवसात १० टन ऊस पूर्णपणे उध्वस्त

mithun mane

सायकलवरून मृतदेह नेल्याप्रकरणी काँग्रेसची सरकारवर टीका

Patil_p

सोमवार गर्दीचा… वाहतूक कोंडीचा!

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक परिसरात उत्साहात श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना

Patil_p
error: Content is protected !!