Tarun Bharat

कॅगिसो रबाडा चौथ्या कसोटीतून निलंबित

जो रुटला बाद केल्यानंतर अति आक्रमकतेचा फटका

पोर्ट एलिझाबेथ / वृत्तसंस्था

तिसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जो रुटला बाद केल्यानंतर अति आक्रमक शैलीत आनंद साजरा केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकन गोलंदाज कॅगिसो रबाडाला चौथ्या कसोटी सामन्यातून निलंबित केले गेले. याशिवाय, त्याला 15 टक्के मानधन कपातीचा दंड व एक डिमेरिट गुण अशी शिक्षाही ठोठावण्यात आली. आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा अनादर करणारी भाषा वापरल्याबद्दल किंवा कृती केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्यावर ही कारवाई केली गेली. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी ही घोषणा केली.

पहिल्या दिवसातील सायंकाळच्या सत्रात रबाडाने जो रुटला बाद केल्यानंतर फॉलोथ्रूमध्ये अगदी त्याच्यासमीप जात अति आक्रमक शैलीत संताप व्यक्त केला. शिवाय, रुटकडे रागाने पाहिले. रासी व्हान डेर डय़ुसेन व पीटर मालन यांनी रबाडाभोवती गराडा घालत त्याला बाजूला केले. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजी प्रशिक्षक चार्ल लँगवेल्ट यांनी रबाडाला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची सूचना नंतर केली. मैदानी पंच रॉड टकर व ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी तिसरे पंच जोएल विल्सन, चौथे पंच अलाहुद्दीन पालेकर यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि कोणत्याही सुनावणीशिवाय, रबाडावर कारवाई केली गेली.

Related Stories

कनिष्ठ मुलींच्या जागतिक क्रमवारीत अनुपमा अग्रस्थानी

Patil_p

कोरियन एफए चषक फुटबॉल स्पर्धा 9 मे पासून

Patil_p

1500 मी.इनडोअर शर्यतीत गुडाफ त्सेगेचा नवा विश्वविक्रम

Patil_p

ख्रिस्टीच्या लिलावात गावसकरांची कॅप, शास्रीच्या प्रशिक्षण किटचा समावेश

Patil_p

वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेला सुवर्ण

datta jadhav

न्यूझीलंडकडूनही आयपीएल भरवण्याचा प्रस्ताव

Patil_p