Tarun Bharat

कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रिया मलिकला सुवर्ण

वृत्तसंस्था/ बुडापेस्ट

भारताची युवा मल्ल प्रिया मलिकने विश्व कॅडेट कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. 73 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत तिने क्सेनिया पाटापोविचचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित हे यश मिळविले.

टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये शनिवारी मिराबाई चानूने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवित भारतीयांना खुश केले होते. त्यानंतर प्रियाने  या सुवर्णपदकाने हा आनंद द्विगुणित केला आहे. प्रियाने यापूर्वे 2019 मध्ये पुण्यात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर दिल्लीत झालेल्या 17 व्या स्कूल गेम्समध्येही तिने पहिले स्थान मिळवित सुवर्ण मिळविले होते. येथील स्पर्धेतही याआधी भारताच्या तन्नूने 43 किलो वजन गटाचे सुवर्णपदक पटकावले आहे.

Related Stories

उमरान मलिकचा हैदराबाद संघात समावेश

Patil_p

पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

महिला फुटबॉल लीग स्पर्धा 15 एप्रिलपासून

Patil_p

रियल काश्मिर फुटबॉल क्लबकडून मदत

Patil_p

मुंबई सिटीचा निसटता पराभव

Patil_p

जमैकाची इलेन थॉम्पसन 200 मीटर्समधील विजेती

Patil_p