Tarun Bharat

कॅनडाच्या पंतप्रधान निवासाला 50 हजार ट्रक चालकांनी घेरले

Advertisements

ऑनलाईन टीम / ओटावा :

कॅनडामध्ये कोरोना लसीकरणाची सक्ती आणि लॉकडाऊनला ट्रक चालकांनी कडाडून विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात जवळपास 50 हजार ट्रक चालकांनी 20 हजार ट्रकसह पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या ओटावा येथील निवासस्थानाला घेराव घातला आहे. ट्रक चालकांचा हा ताफा जवळपास 70 किमी लांबवर पसरला असून, या ताफ्याला फ्रीडम कॉन्वेय’ असे नाव देण्यात आले आहे.

लॉकडाऊनची नियमावली आणि अमेरिकेची सीमा पार करण्यासाठी कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे हजारो ट्रक चालकांनी यास विरोध दर्शविला आहे. याचवेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ट्रक चालकांना महत्व वाटत नसलेले अल्पसंख्यांक अशी उपमा दिल्याने हे ट्रकवाले भडकले आहेत. ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. ओटावातील रस्त्यांवर सर्वत्र ट्रकच ट्रक दिसत आहेत. जवळपास 50 हजार ट्रक चालकांनी 20 हजार ट्रकसह थेट पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या ओटावा येथील निवासस्थाला घेराव घातला आहे. ट्रकचालकांचा हा आक्रोश पाहून पंतप्रधान ट्रुडोही भयभीत झाले असून ते अज्ञात स्थळी निघून गेले आहेत. त्यामुळे ओटावा येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी सक्तीच्या लसीकरणाचा निर्णय आणि कोरोना निर्बंध त्वरीत मागे घ्यावेत, तसेच पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.

Related Stories

‘आरोग्य’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करा

Sumit Tambekar

विधानपरिषद निवडणूक: सतेज पाटील बिनविरोध

Abhijeet Shinde

मोदींच्या हत्येचा कट; NIA च्या मुंबई कार्यालयात निनावी ईमेल

datta jadhav

आफ्रिकेत ‘इबोला’मुळे 4 जणांचा मृत्यू

datta jadhav

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी 18 केनियन महिला ताब्यात

datta jadhav

केवळ झोपण्यासाठी बसमधून प्रवास

Amit Kulkarni
error: Content is protected !!