Tarun Bharat

कॅनडात कोरोना रुग्णांची संख्या 95 हजार पार

Advertisements

ऑनलाईन टीम / कॅनडा :


संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कॅनडामध्ये कोरोना बाधितांची संख्या 95 हजार पार झाली आहे. तर आता पर्यंत 7 हजार पेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील लोकांमध्ये चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. 


कॅनडातील सार्वजनिक आरोग्य एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडामध्ये 95 हजार 57 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 7773 जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच कॅनडातील क्युबेक प्रांतात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. क्यूबेक मध्ये 52 हजार 624 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर ओंटारियामध्ये हा आकडा 30 हजार 202 वर पोहचला आहे. 


दरम्यान, कॅनडात आता पर्यंत 18 लाख 68 हजार लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. त्यातील साधारण पाच टक्के जनता या महामारीची शिकार झाले आहेत. 

Related Stories

”शिखांच्या पगडीला विरोध नाही मग हिजाबला का ?”

Abhijeet Khandekar

राज्य सरकारची नवी नियमावली जारी; दुकानं फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार

Archana Banage

अफगाणिस्तानात 6 महिन्यात कोसळणार सरकार!

Patil_p

अधिश बंगल्याबाबत राणेंची याचिका न्यायालयाने फेटाळली

Archana Banage

पीएफआयवरच बंदी का? RSS या संघटनेवर बंदी का नाही; काँग्रेस खासदारांचा सवाल

Archana Banage

मेक्सिकोत कोरोना रुग्णांचीमृत्युसंख्या 3 लाखावर पोहचणार?

Patil_p
error: Content is protected !!