Tarun Bharat

कॅनरा बँकेच्या एटीएममधून चोरटय़ांनी दीड लाख चोरले

साताऱयातील घटना : दोन अनोळखींवर गुन्हा

प्रतिनिधी / सातारा

सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत असतानाच दोन अज्ञात चोरटय़ांनी साताऱयातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून 1 लाख 60 हजार रुपये चोरल्याची घटना घडलीय. याप्रकरणी दोन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना दि. 20 ते 30 सप्टेंबर कालावधीत घडली आहे.

बँकेचे मॅनेजर विनायक मारुतराव जगाडे (वय 31, रा. सिध्दी विनायक अपार्टमेंट, खेड, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टारंट चौकात ममता निवास जुनी एमआयडीसी रस्त्यावर कॅनरा बँकेचे एटीएम आहे. दोन अनोळखी चोरटय़ांनी संगनमत करुन एटीएमचा मशीनचा स्वीच बंद केला.

त्यानंतर या चोरटय़ांनी मशीनमधील एक लाख 60 हजार काढून घेत बँकेची फसवणूक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन ही बाब बँक अधिकाऱयांच्या लक्षात आली. मशीनमधून दोन अज्ञात चोरटय़ांनी हे पैसे लांबवल्याने शहरातील एटीएम मशीनची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार झाल्यावर पोलिसांनी दोन अनोळखी चोरटय़ांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. बँकेने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात दिले असून या चोरीचा पुढील तपास पोलीस नाईक भोसले करत आहेत.

Related Stories

ऑनलाईन लॉटरी केंद्रावर शाहुपुरी पोलिसांचा छापा

Patil_p

चार डिलिव्हरी बॉयवर चोरीचा गुन्हा

datta jadhav

तर मंदिरे उघडायला काय प्रॉब्लेम : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

Archana Banage

अपहरण करुन पुण्याच्या व्यापाऱयाचा खून

Patil_p

महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले

datta jadhav

देऊळ बंद पण भक्तांना थांबवणार कोण?

Patil_p