Tarun Bharat

कॅन्टीनमध्ये काम करून फेडले शाळेचे ऋण

प्रतिनिधी/ गंगाधर पाटील :

मदत करायची असेल तर मोठय़ा हुद्दय़ाचीच नोकरी किंवा मोठा उद्योग आवश्यक नसतो. तर मदत करण्याची तीव्र भावना असली पाहिजे. आई-वडिल असोत, गुरु असोत किंवा ज्या शाळेने शिकवले त्याचे उपकार कधीच फेडता येत नाहीत. याच प्रेरणेतून हॉटेलमध्ये काम करणाऱया एका श्रमिकाने आपल्या शाळेला तब्बल 2 लाख 15 हजार 520 रुपये अशी भरघोस मदत केली आहे.

कोल्हापूर जिह्यातील चंदगड तालुक्मयामधील मौजे कळसगादे या गावातील धोंडीबा गणेश दळवी यांनी ही मदत केली आहे. केवळ दहावीपर्यंत या शाळेत शिक्षण घेतले. मात्र या शाळेचे ऋण कसे फेडायचे, या विचारात ते होते. या शाळेतून अत्यंत कष्टाने शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. त्या ठिकाणी महानगरटेलीफोन निगम लि.चे कॅन्टीन होते. त्या कॅन्टीनमध्ये त्यांनी काम केले. त्या ठिकाणी काम करत त्यांनी आपला उदरनिर्वाह चालविला. पत्नी धनश्री यांचीही त्यांना चांगली साथ मिळाली.

आपल्या वेतनातून तसेच मिळालेल्या फरक रक्कमेतील काही रक्कम त्यांनी जमा केली. शासनातर्फे त्यांना त्यांची हक्काची फरक रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी त्या विरोधात न्यायालयीन लढाई लढली. त्यामधून त्यांना 2 लाख 15 हजार 520 रुपये मिळाले. ही रक्कम आपल्याला दहावीपर्यंत शिक्षण दिलेल्या तिलारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री माऊली विद्यालय तिलारीनगर-कळसगादे या शाळेच्या इमारतीला देण्याचे त्यांनी ठरविले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष टी. एल. गावडे यांच्याकडे त्यांनी हा धनादेश दिला.

मुंबईसारख्या ठिकाणी राहत असताना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले. मात्र त्यामधूनही त्यांनी या शाळेच्या इमारतीसाठी जी मदत केली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. अनेक जण शाळा शिकून मोठे होतात. मात्र ते माघारी बघत नाहीत. देशपातळीवर तसेच परदेशात विविध हुद्यावर नोकऱया करुन देखील शाळेला अशी भरघोस मदत करत नाहीत. मात्र कॅन्टीनमध्ये काम करणाऱया या व्यक्तीने आपल्या लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त ही रक्कम दिली आहे.

या त्यांच्या उदारतेबद्दल तिलारीनगरसह चंदगड तालुक्मयातील शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. या शाळेच्या संस्थापकांनी तसेच संचालक मंडळांनी देखील त्यांचे आभार मानले आहे. धोंडीबा दळवी हे अत्यंत गरीब कुटुंबातील होते. शेती व्यवसाय करत त्यांनी या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र त्यांनी आपणाला शिक्षण दिलेल्या शाळेचा विसर पडू दिला नाही. ही बाब कौतुकास्पद आहे.

मला मोठी नोकरी लागली किंवा मी मोठा उद्योगपती झालो तर मदत करु, अशी भावना अनेक जण व्यक्त करतात. मात्र मदत करायची इच्छा राहिली तर कितीही कमी शिकले आणि गरीब असलो तरी मदत करु शकतो हे त्यांनी दाखवून दिले. समाजासमोर धोंडीबा दळवी यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सध्या ते मुंबईत आहेत. पूर्वीपेक्षा आता मी सधन आहे. त्यामुळे काही तरी मदत केली पाहिजे ही जाणिव ठेवून मी मदत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

काळा दिवस पाळून केंद्र शासनाचा निषेध

Archana Banage

कोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच विजयी

Archana Banage

गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये घुसले शिवदुर्ग संवर्धन आंदोलन कार्यकर्ते

Archana Banage

पुणे- बेंगलोर महामार्गावर ३४ लाखांचा पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त

Archana Banage

महाराष्ट्र : 4,122 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 %

Tousif Mujawar

शिल्लक चिंध्यापासून मास्क तयार करून त्यांचे मोफत वाटप

Patil_p