प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टेंन्मेट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. तसेच नविन सभागृह अस्तित्वात येईपर्यत जनतेच्या समस्याचे निवारण करण्यासाठी सरकारच्यावतीने जनतेमधून सदस्याची नियुक्ती करण्यात येते. याकरिता कॅन्टेंन्मेट बोर्डकडे दहा नावे आली असून यावर चर्चा करून तीन नावे सदर्न कमांड कडे पाठविण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकालावधी संपु÷ात आल्याने सभागृह बरखास्त करण्यात आले आहे. सभागृह बरखास्त केल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डचे कामकाज पाहण्यासाठी दोन प्रशासकीय अधिकारी आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लोकनियुक्त सभागृह अस्तीत्वात येईपर्यंत कारभार पाहण्याची जबाबदारी या सदस्यांवर असते. कॅन्टोन्मेंट बोर्ड लोकनियुक्त सभागृह बरखास्त केल्यानंतर स्टेशन कमांड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचा आदेश सदर्न कमांडने बजावला होता. मात्र लोकप्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली नव्हती. सदर निवड करण्यासाठी तीन नागरिकांचे अर्ज घेण्यात येतात. मात्र आतापर्यंत कोणतीच प्रक्रिया झाली नव्हती. बुधवार दि. 3 रोजी सदर्न कमांडने कॅन्टोन्मेंट बोर्डला पत्र पाठवून जनतेमधुन सदस्य नियुक्तीसाठी तीन नागरिकांची नावे पाठविण्याची सूचना केली आहे. सदर नागरिकांचा संपूर्ण बायोडाटा पाठविण्यात यावा, मात्र या व्यक्ती कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत राहता कामा नये. व कॅन्टोन्मेंट बोर्डवर काम करण्यासाठी इच्छुक असावेत. दि. 19 मार्च पूर्वी सदर नावे सदर्न कमांड पुणे यांच्याकडे पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेमधून सदस्य नियुक्तीसाठी कॅन्टेंन्मेट परिसरामधून दहा अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अर्जाची पडताळणी करण्याचे काम शुक्रवारी हाती घेण्यात आले होते. याकरिता ब्रिगेडीअर व मुख्य कार्यकारी अधिकाऱयाची बैठक झाली. जनतेमधून आलेल्या दहा अर्जाची माहिती घेवून यामधून तीन नांवे सदर्न कमांडकडे पाठविण्यात येणार आहेत. यामुळे लवकरच सरकार नियुक्त सदस्याची निवड होण्याची शक्मयता आहे.