Tarun Bharat

कॅन्टोन्मेंटच्या गाळय़ाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला

प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट हद्दीतील ओल्ड ग्रँट बंगल्यांचे सर्वेक्षण करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले असून, समितीच्या माध्यमातून अतिक्रमणाची माहिती घेण्यात येणार आहे. अतिक्रमणाच्या माहितीचा अहवाल बैठकीत सादर केल्यानंतर अतिक्रमण हटविण्याबाबतचा निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले. जुना धारवाडरोड येथील व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रीया राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी ओल्ड ग्रँट बंगल्यांच्या सर्व्हेक्षणावर पुन्हा एकदा चर्चेचे गुऱहाळ चालले. अतिक्रमणाची माहिती घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मागील बैठकीत घेण्यात आला होता. मात्र याला काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे सर्व्हेक्षणाच्या मुद्यावर बैठकीत पुन्हा चर्चा झाली. केवळ अतिक्रमणाची माहिती घेण्यासाठी समितीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे बंगल्यांचे रिझम्प्शन होणार नाही, अशी माहिती अध्यक्ष रोहित चौधरी यांनी दिली. तसेच ओल्डगँट बंगल्यांच्या सर्व्हेक्षणानंतर अतिक्रमण आढळून आल्याने सदर अतिक्रमणे हटविण्याची सूचना पत्राद्वारे संरक्षण खात्याने केली आहे. त्यामुळे याला सदस्यांनी आक्षेप घेतला. अतिक्रमणाबाबत सर्व्हेक्षण झाल्यानंतर किती अतिक्रमण झाले आहे. याचा अहवाल बैठकीत सादर केल्यानंतरच अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे अहवाल सादर केल्यानंतर बैठकीत चर्चा करून अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्याचे ठरले.

कॅन्टोन्मेंटच्या जुना धारवाड रोड येथील व्यापारी संकुलातील 15 गाळय़ांची मुदत संपु÷ात आली आहे. आणखीन 5 वर्षे मुदत वाढ देण्याची मागणी गाळेधारकांनी कॅन्टोन्मेंटकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुन्हा लीज वाढ करण्याचा अधिकार सभागृहाला नाही. त्यामुळे लीज वाढीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. सदर गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी कायद्यानुसार निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आगामी काळात मुदत संपणारे गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची सूचना करण्यात आली.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत खानापूर रोडचे काम करण्यात येत आहे. पण ग्लोब थिएटर समोरील ऑक्ट्राय नाक्मयाचा खोका आणि कॅन्टोन्मेंट कार्यालयाची संरक्षक भिंत अडथळा ठरत आहे. सदर अडथळा हटविण्याच्या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा झाली. सदर अडथळे हटवून स्मार्ट सिटी योजनेतील कामांना प्राधान्य देण्याची सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली. तसेच फिश मार्केटच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करून प्रस्ताव देण्याची सूचना आमदार बेनके यांनी केली. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डचा कारभार ऑनलाईन करण्यास हिरवा कंदिल देण्यात आला. त्यामुळे व्यवसाय परवाने आणि नागरिकांना तक्रारी करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलचा वापर करता येणार आहे.

यावेळी बैठकीला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा, उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर, सदस्य अल्लेद्दीन किल्लेदार, डॉ. मदन डोंगरे, साजिद शेख, रिझवान बेपारी, विक्रम पुरोहित, अरेबिया धारवाडकर, कार्यालय अधिक्षक एम. वाय. ताळुकर, सहाय्यक कार्यकारी अभियंते सतिश मण्णूरकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

ठिय्या आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार

Patil_p

बहाद्दरवाडी क्रॉसवर भव्य वासरू-रेडकू प्रदर्शन

Rohit Salunke

आता महाराष्ट्राच्या उपराजधानीला विमानसेवा

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटी अनगोळ माळ सोसायटीमध्ये ग्राहक मेळावा-वाढदिवस

Amit Kulkarni

बेंगळूर हिंसाचार: आरएएफ, केएसआरपी आणि बेंगळूर पोलिसांनी काढला रूट मार्च

Archana Banage

ठिबक सिंचनला मिळणार बागायतचे अनुदान

Omkar B