Tarun Bharat

कॅन्टोन्मेंटमधील पथदीप दिवसाही सुरूच

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य : महिनाभरापासून पुरवठा होता ठप्प

प्रतिनिधी /बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्डने विद्युत बिलाची रक्कम भरणा केली नसल्याच्या कारणास्तव हेस्कॉमने पथदिपांचा वीजपुरवठा बंद केला होता. परिणामी कॅन्टोन्मेंट परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. पण लोकप्रतिनिधी व कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विनंतीनंतर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता कॅन्टोन्मेंट परिसरात दिवसादेखील पथदीप सुरू आहेत.

कॅन्टोन्मेंट बेर्डला केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला नसल्याने विद्युत बिलाची रक्कम थकली होती. अडीच कोटीहून अधिक बिलाची रक्कम भरणा केली नसल्याने हेस्कॉमने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या पथदिपांचा विद्युत पुरवठा बंद केला होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. रस्त्याची दुरवस्था आणि पथदीप बंद असल्याने वाहनधारक तसेच रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. महिनाभर विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. तसेच याबाबत खासदार, आमदार आणि जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची विनंती कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने करण्यात आली. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदिपांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

दिवसा पथदीप सुरू ठेवण्याचा उद्देश काय?

अलिकडे कॅन्टोन्मेंट परिसरातील काही पथदीप दिवसादेखील सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या चार दिवसांपासून कॅन्टोन्मेंटमधील पथदीप दिवसा सुरू ठेवण्यात येत असून ते सुरू ठेवण्यामागचा हेतू काय, असा मुद्दा उपस्थित होत आहे. एकीकडे बिलाची रक्कम भरणा करण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडे निधी नाही. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठी निधी नाही. अशातच दिवसा पथदीप सुरू ठेवण्यात येत आहेत. बुधवारी कॅन्टोन्मेंटमधील संपूर्ण भागातील पथदीप सुरू होते. त्यामुळे दिवसा पथदीप सुरू ठेवण्याचा उद्देsश काय, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

Related Stories

माळी गल्ली येथे दोघा मटकाबुकींना अटक

Tousif Mujawar

बेळगुंदी-राकसकोप रस्ता बनला धोकादायक

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शुक्रवारी 156 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Patil_p

कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांना कोरोनाची धास्ती

Amit Kulkarni

बेळगाव-दिल्ली विमानसेवा फेब्रुवारीपासून पूर्ववत

Omkar B

गोल्डन व्हॉईसच्या अंतिम फेरीमध्ये रंगणार सुरांची मैफल

Amit Kulkarni