Tarun Bharat

कॅन्टोन्मेंट बोर्डचा पाणीपुरवठा बंद

बिल अदा केले नसल्याने कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्डने पाणीपट्टीचे 2 कोटी रुपये अदा केले नसल्याने पाणीपुरवठा मंडळाने पाणीपुरवठा बंद केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पाणीपुरवठा मंडळाची थकबाकी वाढली असल्याचे सांगून पाणीपट्टीवाढ करण्यात आली होती. तरीदेखील थकबाकी जैसे थे आहे. पण कॅन्टोन्मेंट बोर्डवर प्रशासकीय राजवट लागू झालेल्या पहिल्या दिवशी नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागले आहे.

कॅन्टोन्मेंटच्या रहिवाशांना सहसा पाणीटंचाई समस्येचा सामना करावा लागत नाही. मात्र, गुरुवारी पाणीपुरवठा मंडळाने कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा बंद केल्याने कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना पाणी समस्येची झळ पोहचली.

 कॅन्टोन्मेंट बोर्डने पाणीपुरवठा मंडळाचे दीड कोटीचे बिल थकविले होते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने पाणीपट्टीत वाढ करून वाढीव पाणीपट्टी आकारली आहे. तरीदेखील पाणीपुरवठा मंडळाची थकबाकी जैसे थे आहे. पाणीपट्टीत वाढ केल्यानंतर थकबाकीच्या रकमेत आणखी 50 लाखांची भर पडली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने पाणीपुरवठा मंडळाचे 2 कोटी बिल थकविले आहे.

 पाणीपट्टी भरण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाने कॅन्टोन्मेंट बोर्डला अनेकवेळा सूचना केली होती.

पण कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी उपलब्ध नसल्याने थकबाकीची रक्कम भरणा केली नव्हती. दोन महिन्यांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डला सूचना करून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. दि. 1 फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेऊन पाणीपुरवठा मंडळाने कारवाई केली होती. मात्र, बिल भरण्यासाठी आठ दिवसांचा अवधी कॅन्टोन्मेंट बोर्डने घेतला होता. मात्र, दहा दिवस झाले तरी कॅन्टोन्मेंट बोर्डने पाणीपट्टी बिल भरले नसल्याने गुरुवारपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा मंडळाने पाणीपुरवठा बंद केल्याने कॅन्टोन्मेंटवासियांना पाणीपुरवठा करण्यात आला नाही. परिणामी रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.  गुरुवारी दिवसभर कॅन्टोन्मेंटच्या कोणत्याच भागात पाणीपुरवठा करण्यात आला नाही. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुबलक पाणी असताना कॅन्टोन्मेंटवासियांना मात्र पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील काही नागरिकांनी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता, पाणीपुरवठा मंडळाने पाणीपुरवठा बंद केला असल्याचे सांगण्यात आले. पाणीपट्टी भरण्याच्या नावाखाली पाणीपट्टीत वाढ करण्यात आली होती. नागरिकांनी वाढीव पाणीपट्टी भरूनदेखील पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाणीपट्टीची रक्कम भरल्यानंतरच पाणीपुरवठा

पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता पाणीपट्टीची रक्कम भरल्यानंतरच कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे कॅन्टोन्मेंटला आता पाणीपट्टीची रक्कम अदा करावी लागणार आहे. 

Related Stories

बेंगळूर: बीबीएमपी आयुक्तांनी कोरोना जबाबदाऱ्यांबाबत केएएस अधिकाऱ्यांना दिली माहिती

Archana Banage

मसणाई देवीची यात्रा भरविण्यासाठी आतातरी मुभा द्या

Amit Kulkarni

बिजगर्णी गावच्या वेशीजवळ बिबटय़ाची एंट्री

Patil_p

मराठी भाषिकांच्या निवडीबद्दल जाहीर आभार

Patil_p

स्काऊट-गाईडचे कार्य कोरोना काळातही कौतुकास्पद

Amit Kulkarni

नादुरुस्त बसगाड्यांनी प्रवासी हैराण

Amit Kulkarni
error: Content is protected !!