Tarun Bharat

कॅन्सरग्रस्त आईची सर्व काळजी घेणारा ‘किट्टू’ रोबोट

Advertisements

कृष्णाने बेंगळुरात बसून केली रिमोटद्वारे मदत : माधुरी शानभाग यांनी ऑडिओद्वारे सादर केली स्वलिखित कथा

प्रतिनिधी/ बेळगाव

आई ही व्यक्ती आपल्या देशात सर्वांनाच जवळची आहे. साठी सर्व काही करणारे मुलं मुली, आजही आपल्या आहेत. आधी अमेरिकेत काही वर्षे काम करून आता आईसाठी बेंगळूरला ईस्त्राsमध्ये मंगळयान प्रकल्पामध्ये रोबोटिक्स  विभागाची जबाबदारी घेणारा कृष्णा किंवा आईचा किट्टू आणि धारवाडमध्ये मोठय़ा घरात बसप्पा – माली या दोन जुन्या नोकरांच्यावर अवलंबून असलेली ब्रेन कॅन्सरने आजारी, दृष्टी अधू झालेली, बेंगलोरला यायला नकार देणारी, मरणासन्न आई, याची सतत कृष्णाला वाटणारी साहजिकच चिंता, आठवडय़ाला धावत पळत रेल्वेतून धारवाडला केवळ आईला भेटायला यायचं, तिला समाधान द्यायचं आणि पुन्हा सोमवारी सकाळी बेंगलोरला ईस्त्राsत झोकून देशासाठी काम करायचं अशा कोंडीत सापडलेल्या कृष्णाची, स्वलिखीत कथा बेळगावच्या लेखीका माधुरी शानभागनी ऑडीयोद्वारे सादर केली.

भजने, बरं नाही.. झोप… असे संदेश

 विद्या देशपांडेनी परीचय करून दिला. माधुरी शानभाग म्हणाल्या, मंगळ यानाच्या उड्डाणाची तारीख जवळ येऊ लागली तसं कृष्णाचं कामही वाढलं. आता काही आठवडे तरी कृष्णा आईच्या भेटीला धारवाडला येऊ शकणार नव्हता. म्हणून आपल्या रोबोटीक्स ज्ञानाचा योग्य उपयोग करीत, आपला आवाज, भजने, हात हातात घेणे, हं, हो, बरं, नाही, झोप असे संभाषणाचे शब्दही लोड करून के-2 हा रोबोट बनवून आईला न सांगता घरातील नोकरांकडे सुपूर्द करतो व बेंगळूरहून आपल्या कार्यालयात बसुन त्यावर नियंत्रण ठेवून आईला आपला किट्टूच आपल्याजवळ असल्याचा अनुभव देतो आणि आईची सेवा करतो ही कल्पना प्रभावी ठरते.

मंगळयान यशस्वीपणे अवकाशात झेपावतं आणि ईकडे आईही के-2 या रोबोटच्या मांडीवर आपल्या किट्टूच्याच मांडीवरील उशीवर आपलं डोक ठेवत समाधानाने किट्टूच्या बाबांकडे निघून जाते. सर्व केलेल्या सूचना रोबोट पाळतोच. पण तो पाय दूमडून आईला डोकही ठेवायला मदत करतो. ही घटना कृष्णासह आपल्याला प्रभावित करून जाते. एक सुंदर हृदयस्पर्शी कथा ऐकण्याचा योग लाभला, आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग असाही होऊ शकतो, हेही कळले.

Related Stories

समितीशी द्रोह; माजी आमदारांना प्रत्युत्तर देणार

Omkar B

तिसऱया रेल्वेगेटच्या उड्डाणपुलाचे उद्या लोकार्पण

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील पावसाचा जोर ओसरल्याने समाधान

Omkar B

पहिल्याच पेपरला 350 विद्यार्थ्यांची दांडी

Amit Kulkarni

चन्नम्मा विद्यापीठाचा अजब कारभार

Amit Kulkarni

क्वारंटाईन-कोरोना रुग्णांना पोस्टल मतदानाची सोय

Amit Kulkarni
error: Content is protected !!