Tarun Bharat

कॅम्पमध्ये पारंपरिक पद्धतीने रथोत्सव होणार

दसरोत्सवाला शतकोत्तर वर्षांची परंपरा : नावीण्यपूर्ण रथांमुळे बेळगावमध्ये मिळविला लौकिक : पाच देवींची निघतेय मिरवणूक

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावमधील कॅम्प परिसरात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित गुण्यागोविंदाने राहतात. येथील दसरोत्सवाला शतकोत्तर वर्षांची परंपरा आहे. पाच देवींची मंदिरे असून त्या देवींची रथ मिरवणूक काढली जाते. वाजतगाजत जल्लोषात काढले जाणारे रथोत्सव पाहण्यासाठी बाहेरून भाविक येतात. यावषी कोरोनामुळे रथोत्सव होणार की नाही, अशी संभ्रमावस्था असली तरी पारंपरिक पद्धतीने रथोत्सव होणार आहे.

कॅम्पमध्ये मरिअम्मा देवी, कुंतीदेवी, मरिमाता व दुर्गामाता, लक्ष्मीदेवी तुलकनमा, मुत्तूमरिअम्मा अशा पाच देवींची मंदिरे आहेत. विशेष म्हणजे या सर्व देवींच्या मूर्ती लाकडी आहेत. आजही कॅम्प येथे ब्रिटिशकालीन पारंपरिक दसरोत्सव पहायला मिळतो. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत विविध कार्यक्रम केले जातात. कॅम्प परिसरातून विजयादशमीला देवीची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. विद्यानिकेतन येथे सीमोल्लंघनानंतर रथोत्सवाची सांगता होते.

मरिअम्मा देवी

खानापूर रोड येथे मरिअम्मा देवीचे मंदिर आहे. 1901 पासून मरिअम्मा देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. 1950 पर्यंत पालखी काढण्यात येत होती. त्यानंतर रथोत्सवाला सुरुवात झाली. मरिअम्मा देवीचा पहिला रथ कॅम्प परिसरात काढण्यात आला. यावषी नवरात्रोत्सवाचे 120 वे वर्ष असून सर्व पारंपरिक विधी केले जाणार असल्याचे दामोदर के. पुजारी यांनी सांगितले. 

मरिमाता व दुर्गामाता

तेलगू कॉलनी येथे 1961 पासून मरिमाता व दुर्गामातेच्या रथोत्सवाला सुरुवात झाली. तेव्हापासून आजवर मोठय़ा उत्साहात रथोत्सव साजरा करण्यात येतो. घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 

महामाता कुंतीदेवी

मद्रास स्ट्रीट फिश मार्केट येथे महामाता कुंतीदेवीचे मंदिर आहे. प्रथेप्रमाणे घटस्थापनेपासून देवी गाभाऱयातून बाजूला ठेवली जाते. दसऱयादिवशी कॅम्प परिसर फिरून सीमोल्लंघनानंतर देवी पुन्हा गाभाऱयात बसते. दरवर्षी विविध स्वरुपामध्ये देवीचा रथ काढण्यात येतो. नावीण्यपूर्ण रथांमुळे बेळगावमध्ये लौकिक मिळविला आहे.

मुत्तूमरिअम्मा देवी

बी मद्रास स्ट्रीट येथे मुत्तूमरिअम्मा देवीचे मंदिर आहे. मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा असून मागील 90 वर्षांपासून रथोत्सव काढला जात आहे. नवरात्रीमध्ये देवीची पूजा केली जात असून दसऱयादिवशी रथोत्सव होतो.

लक्ष्मीदेवी तुलकनमा

कॅम्प येथील आर. ए. लाईन येथे लक्ष्मीदेवी तुलकनमा देवीचे मंदिर आहे. या देवीला बात्रीची देवी म्हणूनही ओळखले जाते. मंदिर कॅम्पपासून बऱयाच दूर आहे. दसऱयादिवशी देवीचा वाजतगाजत रथ काढण्यात येतो. 150 वर्षांची परंपरा मंदिराला असल्याचे पुजाऱयांनी सांगितले.

Related Stories

बहीण-भावाचा शेततळय़ात बुडून मृत्यू

Patil_p

हिंडलगा येथील वृद्ध महिलेला गॅस सिलिंडरचे वितरण

Amit Kulkarni

युनियन जिमखाना अंतिम फेरीत

Amit Kulkarni

तुरमुरीतील ‘त्या’ पाण्याचा निचरा न केल्यास रास्तारोको

Amit Kulkarni

उद्यमबाग येथे ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकण्याचा प्रकार

Amit Kulkarni

जीआयटी-महेश फौंडेशनमध्ये समन्वय करार

Patil_p