Tarun Bharat

कॅम्प खूनप्रकरणाचे धागेदोरे हाती

Advertisements

पोलीस आयुक्त आज देणार माहिती

प्रतिनिधी /बेळगाव

कॅम्प येथील रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खूनप्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. पोलिसांनी पुणे येथील एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आठ ते दहा दिवसांत या प्रकरणाचा तपास तडीस नेण्यात आला आहे.

सुधीर भगवानदास कांबळे (वय 57) रा. मद्रास स्ट्रीट, कॅम्प या रिअल इस्टेट व्यावसायिकाचा खून झाल्याचे शनिवार दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आले होते. आदल्या दिवशी 16 सप्टेंबरच्या रात्री 11 पासून 17 तारखेच्या सकाळी 7 यावेळेत या व्यावसायिकाचा खून झाला होता. सुधीरच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक चौकशीतून या प्रकरणात काही स्वकियांचा सहभाग असल्याचा संशय बळावला. त्यानंतर पुणे येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असून याप्रकरणाचा उलगडा झाल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्याशी संपर्क साधला असता तपास पूर्ण झाला आहे. मात्र, काही गोष्टींची अजूनही खातरजमा व्हायची असल्याने गुरुवारी सायंकाळी संपूर्ण माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

उष्म्याचा तडाखा अन् कोरोनाची वाढती धास्ती!

Amit Kulkarni

शहापूर-खडेबाजार रस्त्यावर वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

अतुल शिरोळेकडून धोबीपछाडवर संकेत पराभूत

Amit Kulkarni

येडियुराप्पा मार्गावर सांडपाण्याचे तळे

Amit Kulkarni

विजयनगरजवळ जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni

खानापूर बसवेश्वर सर्कल-पारिश्वाड क्रॉस रस्ता विकासकामाला मंजुरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!