Tarun Bharat

केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा दरीत कोसळून गंभीर

प्रतिनिधी/ वाई

केंजळगडावर (ता. वाई) चढाई करत असताना दहा वर्षाचा मुलगा खोल खड्डय़ात  कोसळून गंभीर जखमी झाला. त्यास पाखेरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले आहे. त्याला वाई येथील प्राथमिक उपचारानंतर पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

केंजळगडावर पर्वतारोहण करण्यासाठी सासवड (ता.पुरंदर) परिसरातील रहिवासी असलेले सात ते आठ पर्यटक आले होते. यामध्ये मयांक उरणे हा आपल्या वडीलांसोबत आला होता. केंजळगडावर आज सकाळी सात वाजता पर्वतारोहण यासाठी सुरुवात केली. सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान पुढे जात असताना या चमूतील मयांक उरणे (वय 10)  हा दोनशे फूट खोल कोसळून गंभीर जखमी झाला. पावसाची रिपरिप वाढलेल्या गवतावरुन पाय घसरून तो दोनशे फूट दरीत कोसळून झाडाला धडकून झुडपात अडकला होता. त्याचा शोध करुनही तो सापडत नसल्याने आसरे ते रायरेश्वर रस्त्यावर असणाऱया पाखिरे वस्तीवर संबंधित पर्यटकांनी येऊन माहिती दिली. तेथील गंगाराम सपकाळ, सागर पाकीरे, सुरेश पाकीरे, रामदास पाकीरे, सचिन पाकीरे, नवनाथ पाकीरे, विलास पाकीरे, विजय पाकीरे असे सर्वजण ग्रामस्थांना सोबत त्याचा शोध घेतला. त्याला खोल दरीतून

गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वाई येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुण्यात दाखल केला आहे. अशी माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय मोतेकर, पोलीस नाईक, सहकारी शिवाजी वायदंडे, सुभाष धुळे, प्रशांत शिंदे, अमित गोळे, संजय देशमुख, संतोष शेलार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाखिरे वस्तीतील युवकांनी मुलाचा शोध घेऊन बाहेर काढल्याबद्दल व मदत कार्य केल्याबद्दल वाई तालुक्यातील नागरिकांनी वरील वस्तीतील ग्रामस्थांचे आभार मानले.

Related Stories

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनीच मागितला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रवासाचा परवाना

Archana Banage

काजू कारखानदारांच्या समस्या, अडचणीबाबत समरजित घाटगे यांचे जिल्हा प्रबंधकांना निवेदन

Archana Banage

पन्हाळा पाणी प्रश्न सुटता सुटेना

Archana Banage

काय करायचे ते ठरले आहे,शिवसेना छत्रपती घराण्याचा सन्मान करेल:संभाजीराजे छत्रपती

Rahul Gadkar

घाईघाईने निर्बंध शिथिल करून धोका पत्करू नका : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

सातारा : ‘म मॅरेथॉन’ पुस्तकाचे प्रकाशन

datta jadhav
error: Content is protected !!