Tarun Bharat

केंट क्रिकेट क्लबचा जॅक्सन बर्डशी नवा करार

वृत्तसंस्था/ केंट

इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया केंट क्रिकेट क्लबने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्डबरोबर नवा करार केला. 2022 च्या इंग्लिश कौंटी क्रिकेट हंगामातील उर्वरित सहा सामन्यांसाठी केंट क्लबने बर्डशी हा करार केल्याची माहिती संचालक पॉल डाऊनटन यांनी दिली.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्डने प्रथमश्रैणी क्रिकेटमध्ये 100 सामन्यांत 24.21 धावांच्या सरासरीने 419 बळीं मिळविले आहेत. बर्डच्या समावेशामुळे केंट क्लबची गोलंदाजी अधिक भक्कम होईल, अशी आशा या क्लबच्या संचालकांनी व्यक्त केली.

Related Stories

नीरज चोप्रा आज मायदेशी परतणार

tarunbharat

रविंदरला रौप्यपदक, फ्री स्टाईल प्रकारात भारताला 6 पदके

Amit Kulkarni

विश्व टेटे संघटनेचे कर्मचारी स्वतःहून कमी वेतन घेणार

Patil_p

आजपासून पैलवानी ‘दंगल’

datta jadhav

हरियाणात दोन आयटीएफ टेनिस स्पर्धांचे आयोजन

Patil_p

के. प्रशांतचा चेन्नईन संघाशी करार

Patil_p