Tarun Bharat

केंद्राकडे जास्त लस मागणी करणार त्यासाठी फडणवीसांना घेऊन भेटायला जाणार – राजेश टोपे


पुणे \ ऑनलाईन टीम

राज्याला चार पाच दिवसांत दहा लाख कोरोना प्रतिबंध लस मिळते. ती रोज मिळायला हवी. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत,आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊन भेटायला जाणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राष्ट्रीय शीत साखळी संसाधन केंद्राचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. विधानपरीषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास, आरोग्य सेवा विभागाच्या संचालिका अर्चना पाटील, आमदार चेतन तुपे उपस्थित होते. त्या कार्यक्रमानंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्याला चार पाच दिवसांत दहा लाख कोरोना प्रतिबंध लस मिळते. ती रोज मिळायला हवी. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत, आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊन भेटायला जाणार आहोत, असं राजेश टोपे म्हणाले. जिथे जिथे पूरस्थिती असेल, तिकडे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत. या भागात लसीकरण करा असं सांगितलं आहे, आरोग्य युनिट तयार करण्यात आल्या आहेत, सर्व जण मदत करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र देशातील अन्य राज्यात मृत्यू झाले असतील, त्या बद्दल मी भाष्य करणार नाही. तसंच अधिवेशनात सभागृहात बसलेले काही जण म्हणालेत की, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले आहेत. पण त्यांनी राज्याचं नाव घेतलेले नाही. महाराष्ट्रात असे मृत्यू झालेले नाहीत, असं राजेश टोपे म्हणाले.

Related Stories

१० वी च्या प्रश्न पत्रिकेत महिलांविरोधात परिच्छेद

Abhijeet Khandekar

दगडफेक केलेले तरुण पंपावर गेले का, कदमवाडीत?, चौकशी करा : पालकमंत्री

Archana Banage

“महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, फक्त सत्तेचे भोगी”: राज ठाकरे

Archana Banage

शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करा

Patil_p

गर्दीच करणार असाल तर कठोर निर्णय घ्यावा लागेल – महापौर किशोरी पेडणेकर

Archana Banage

शिरोली दुमाला गावचे कृष्णात कांबळे यांचा विहिरीत पडून मृत्यू

Abhijeet Khandekar