Tarun Bharat

”केंद्राप्रमाणे कंपन्या विकून राज्याला पैसे मिळत नाहीत”

Advertisements

रोहित पवारांचा चंद्रकात पाटलांवर पलटवार

मुंबई / ऑनलाईन टीम

देशभरात इंधनदर वाढीवरुन नागरिकांत असंतोष पसरला असून याचे पडसाद राजकिय पटलावर ही उमटत आहेत. याच मुद्यावरुन आमदार रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार करत, केंद्राप्रमाणे कंपन्या विकून राज्याला पैसे मिळत नाहीत, असा टोला लगावला आहे.

पेट्रोल दर वाढीवरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी काही राज्यांनी आपले कर कमी केल्याने तेथे दर कमी आहेत, असे म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी सरकारने देखील कर कमी करत नागरिकांना दिलासा द्यावा. त्यांनी टीका करू नये,” तसेच केंद्राने केलेली इंधनदरवाढ मान्य करण्याऐवजी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

चंद्रकांत पाटील यांच्या याच मागणी वजा प्रश्नाचे आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार रोहीत पवार यांनी भाजपावर टीका करत राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपच्या एका नेत्याने केल्याचे म्हटले आहे. पण 2014 सालच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी 2014 सालच्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज 350% नी वाढलेला आहे. आज पेट्रोलदर केंद्राचा 32.90 रु तर राज्याचा 28.35 रु कर असल्याचे रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

जपानमध्ये पहिल्यांदाच शिवजयंती उत्साहात

Patil_p

आशीष मिश्रा यांना जामीन देण्यास नकार

Patil_p

एसबीआयकडून कर्ज व्याजदरांवर ‘ऑफर’

Patil_p

समुद्रातील प्लास्टिक कचऱ्यापासून ‘बार्बी’ तयार

Patil_p

पुणे विभागातील 5 लाख 24 हजार 856 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

पुलवामा येथे 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p
error: Content is protected !!