Tarun Bharat

केंद्राला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील – राहुल गांधी

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

गेल्या वर्षभरापासून दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात ही हे आंदोलन अखंडीत सुरू आहे. या आंदोलनात पंजाबसह देशभरातून शेतकरी सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षांनी ही यात त्रूटी असल्याचे स्पष्ट करत कृषी कायद्यांना विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने ही या कायद्यांवरुन सरकारला घेरले आहे. याचाच भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्याविरुद्ध भूमिका घेत केंद्र शासनला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील तसेच हे तिन्ही कायदे शेतकऱ्याला मारक आहेत. असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी सोमवार दिनांक २६ जूलै रोजी सकाळी दिल्लीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांसोबत संसदेत दाखल झाले. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी स्व: ता ट्रक्टर चालवत संसद भवनात पोहोचले. यावेळी रणदीप सुरजेवाला, बीव्ही श्रीनिवास आणि दीपेंद्र हूडा यांच्यासह अनेक काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत ट्रॅक्टरवर दिसले.

यावेळी राहूल गांधींनी “मी शेतकऱ्यांचा संदेश संसदेत आणला आहे. केंद्र सरकार शेतकर्‍यांचा आवाज दाबत आहे. आणि याबद्दल संसदेत चर्चा ही होऊ देत नाही. केंद्राला हे काळे कायदे रद्द करावे लागतील. संपूर्ण देशाला माहित आहे, हे कायदे दोन – तीन बड्या उद्योजकांना मोठे करणारे आहेत” असे ही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

असे असले तरी कायदे परत मागे घेतले जाणार नाहीत, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. पण या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचे प्राण गेले आहेत. तरी ही शेतकरी ही मागे हटायला तयार नाहीत. यामुळे केंद्र शासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

आता 21 ऐवजी 3 दिवस ड्राय डे

datta jadhav

दिल्लीत दिवसभरात 1192 नवे कोरोना रुग्ण; 23 मृत्यू

Rohan_P

शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

Rohan_P

मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवर गुन्हा नोंद

Patil_p

मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rohan_P

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांनी ओलांडला 19.50 लाखांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!