Tarun Bharat

केंद्रावर दुसर्‍या डोसलाही गोंधळ; सीपीआरमध्ये अखेर लस आलीच नाही

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर शहर आणि परिसरासह जिल्ह्यात दुसरा डोस लाभार्थ्यांना प्राधान्याने दिला जात आहे. पण लस येणार की नाही, हा संभ्रम आणि किती टोकन मिळणार, या संदर्भात गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर बुधवारी दुसर्‍या डोससाठी रांगा लागल्या अन् टोकन न मिळाल्याने गोंधळाचे चित्र पहायला मिळाले.

जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 62 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. त्याचे वितरणही सुरू आहे. यातील काही कोटा हा ज्येष्ठ नागरीकांसाठी राखीव आहे. सोमवारी दिव्यांगांना लस दिली जात आहे. अन्य दिवशी प्राधान्यांने ज्यांचे 90 दिवस उलटले आहेत, अशांना दुसरा डोस दिला जात आहे. जूनच्या अखेरीस डोस न मिळाल्याने सप्ताहभर केंद्रे बंद होती. सोमवारी ती सुरू झाली. मंगळवारी लस आल्याचे समजताच केंद्रांवर गर्दी झाली, बुधवारीही महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गर्दी होती. पण सीपीआरमधील लसीकरण केंद्रावर सकाळपासून गर्दी होती. तेथे डोस आलेच नाहीत. अखेरीस दुपारी 12 वाजेपर्यत लाभार्थी थांबून होते. त्यानंतर निराश होऊन ते निघून गेले. पण दुपारपर्यत येथे मात्र गोंधळ अन् वादाचीच स्थिती होती

Related Stories

दिव्यांग असुनही तो करतोय कोरोनाबाबत जनजागृती

Abhijeet Shinde

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठ वाहतूक कोंडीचे नियोजन करा

Abhijeet Shinde

कारची डिव्हायडरला धडक एकजण ठार

Abhijeet Shinde

रेल्वे इंजिनच्या धडकेत चिंचवाड येथील महिलेचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : करवीरमधील अडीच हजार मिळकत धारकांना दिलासा

Abhijeet Shinde

‘स्वाभिमानी’ करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेष आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!