ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनामुळे देशभरातील रेल्वे सेवा सध्या बंद आहे. केवळ अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. दरम्यान, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने तसे एक पत्रक जारी केले आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही विनंती केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी त्यांनी दिली होती. त्यावर आता रेल्वेने अंतिम निर्णय जाहीर आज केला.
तसेच यावेळी शेलार यांनी शहा आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे आभारही मानले आहेत.