Tarun Bharat

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत

प्रतिनिधी /वास्को

केंद्रीय भुपृष्ट वाहतुक व जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांचे सोमवारी दुपारी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आगमन झाले. दाबोळी विमानतळावर मंत्री व भाजपाच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचेही गोव्यात आगमन झाले. दाबोळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचे गोव्यातील नेते व कार्यकर्तेही हजर होते. त्यांनी घोषणाबाजी करून केजरीवाल यांचे स्वागत केले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, मंत्री दीपक पाऊसकर व अधिकारी उपस्थित होते. दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीयमंत्री गडकरी वेर्णा आयडीसी येथे महामार्गाच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी आम आदमी पार्टीचे गोव्यातील अध्यक्ष राहुल म्हांबरे, तसेच प्रतिमा कुतिन्हो, दाबोळीचे ईच्छुक उमेदवार प्रेमानंद नाणोस्कर, इतर नेते व कार्यकर्ते हजर होते. निवडणुक पूर्वतयारीच्या दृष्टीने अरविंद केजरीवाल तिसऱयांदा गोवा भेटीवर आलेले आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मंगळवारी दुपारी दिल्लीकडे प्रयाण करतील

Related Stories

सरकारचे संवेदनशील विषयांकडे दुर्लक्ष

Patil_p

स्पंदन कला महोत्सवात कलाकारांना पुरस्कारानी सन्मानित

Patil_p

डिचोलीत आज कृष्णा माशेलकर स्मृती संगीत संमेलन

Amit Kulkarni

सांखळीत उभी राहतेय पहिली ‘हरित शाळा’

Patil_p

केंद्रीय मंत्री आज घेणार ‘इफ्फी’ तयारीचा आढावा

Amit Kulkarni

शेती नष्ट करून ‘आयआयटी’ होऊ देणार नाही

Omkar B
error: Content is protected !!