Tarun Bharat

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोरोनाचे रिपोर्ट शुक्रवारी निगेटिव्ह आले आहेत. कोरोनावर मात केल्यावर मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः अमित शहा यांनी ट्विट करून दिली आहे. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, आज माझ्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. या दरम्यान ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाप्रती मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


दरम्यान, अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली होती. स्वतः अमित शहा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर साधारण दहा ते बारा दिवस त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आज त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Related Stories

ठाण्याच्या सभेला ये, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो; राज ठाकरेंचा वसंत मोरेंना आदेश

Archana Banage

पार्थ पवार ड्रग्ज पार्टीत होते का? समीर वानखेडे म्हणाले…

Archana Banage

लॉकडाउन संपल्यावरच परीक्षा तारखांची घोषणा

Patil_p

उत्तरप्रदेश पोलिसात 20 टक्के मुलींची भरती होणार

datta jadhav

ठाणे-दिवा दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गांचे पंतप्रधानाच्या हस्ते आज लोकार्पण

Archana Banage

भाजपच्या आंदोलनावेळी प. बंगालमध्ये तणाव

Patil_p
error: Content is protected !!