ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती स्वतः गजेंद्र सिंह शेखावत यांनी ट्विट करत दिली आहे.


गजेंद्र शेखावत आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मला अस्वस्थ वाटत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरून मी रुग्णालयात दाखल होत आहे. माझे आवाहन आहे की गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःहून आयसोलेट व्हावे आणि कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. तसेच आपण सर्वजण स्वस्थ राहा आणि स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, गजेंद्र शेखावत यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.