Tarun Bharat

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचार सभांसाठी केले ‘हे’ नवे नियम

ऑनलाईन टीम / पणजी

संपुर्ण राज्यातील कोरोनास्थिती लक्षात घेत भारतीय निवडणूक आयोगाने आज आढावा बैठक घेतली गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर होऊ घातलेल्या रोड रॅली आणि प्रचार रॅली यांसाठी नवी नियमावली केली असून काही अंशी निर्बंध वाढवले आहेत. आज झालेल्या भारतीय निवडणूक बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.

होऊ घातलेल्या पाच राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांच्या प्रत्यक्ष प्रचार सभा सार्वजनिक सभांसाठी निवडणूक आयोगाने हे नियम लागु केले आहेत.फेज 1 साठी उमेदवारांना 28 जानेवारी 2022 पासून परवानगी आहे तर फेज २ साठी १ फेब्रुवारी २०२२ परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष घरोघरी जात प्रचार करण्यात येतो यासाठी 5 व्यक्तींची मर्यादा वाढवुन ती 10 करण्यात आली आहे. तसेच खुल्या जागांवर प्रसिद्धीसाठी व्हिडिओ व्हॅनला परवानगी देण्यात आली आहे.

या बैठकीत गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे मुख्य सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी आणि आरोग्य सचिव सहभागी झाले होते. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्यासह निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे यांनी कोविड स्थितीचा आढावा घेतला. नियोजित तारखांनुसार येत्या काही दिवसात पाच राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने लसीकरणाचाही आढावा घेतला यासाठी लसीकरण त्वरीत पूर्ण करण्यासाठी स्थिती आणि कृती योजना मतदानासाठी पात्र व्यक्तींसाठी पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस याच बरोबर कर्मचारी आयोगाने निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा केली.

Related Stories

गुजरातच्या किनाऱ्यावर 400 कोटींचे हेरॉईन जप्त

datta jadhav

महाराष्ट्र केसरी विजेत्या पृथ्वीराजला बक्षीस मिळालेच नाही

Abhijeet Khandekar

डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच आज दलितांमध्ये आत्मविश्वास, लवकरच इंदूमिल स्मारक पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

Rahul Gadkar

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, हुपरी-कोल्हापूर मार्ग बंद

Abhijeet Khandekar

पाटणा सिव्हिल कोर्टात पोलिसांनी आणलेल्या बॉम्बचा स्फोट ; तीन पोलीस जखमी

Archana Banage

पुणे : दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात 4 जण गेले वाहून

Tousif Mujawar