Tarun Bharat

केंद्रीय पथकाकडून तालुक्मयातील कामांची पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव तालुक्मयाचा विकास साधण्यासाठी अधिकाऱयांनी केलेली धडपड व ती कामे योग्य पद्धतीने केली आहेत की नाही, याची माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय पथक बेळगावात दाखल झाले आहे. त्यांनी विविध गावांना भेटी देऊन कामांची पाहणी केली. याचबरोबर येथील समस्याही जाणून घेतल्या. बेळगाव तालुक्मयातील काही गावांची निवड करण्यात आली असून आता तालुक्मयातील विकासकामांचा आढावा केंद सरकारकडे पाठविणार आहेत.

Advertisements

दरवषी केंद्रीय पथक तालुक्मयाची पाहणी करते. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे हे पथक बेळगावला येऊ शकले नाही. मात्र यावषी पुन्हा विकासकामांची पाहणी करण्यासाठी हे पथक दाखल झाले आहे. चार दिवस हा पाहणीदौरा असणार आहे. परिणामी अनेक तलावांची खोदाई करून त्यामध्ये पाणी साठविण्याचे काम करण्याची धडपड सुरू आहे. त्याची पाहणी करून याबाबतची माहिती जाणून घेतली आहे. ग्राम पंचायतींना त्यांनी भेट देऊन तेथील कामगारांच्या समस्या ऐकून घेतल्या.

बेळगाव तालुक्मयातील विविध भागांमध्ये पाणी अडविण्याच्यादृष्टीने आता मोठय़ा प्रमाणात पाऊल उचलण्यात येत आहे. तालुक्मयात तलावांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. काही तलावांचे काम पूर्ण झाले आहे. तर काही  तलावांच्या खोदाईचे काम सुरू आहे. हे काम कशा प्रकारे झाले व त्याचा लाभ शेतकऱयांना कसा होणार याबाबत चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे उद्योग खात्रीतील कामगारांचीही त्यांनी माहिती जाणून घेतली. सरकारच्या नियमाप्रमाणे सर्व सुविधा मिळतात की नाही याबद्दल कामगारांशी चर्चा केली.

एकीकडे पाणी पातळी घटत चालली असून ही समस्या भविष्यात धोका निर्माण करणारी आहे. यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारने विविध योजना राबवून पाणी जमिनीत कसे झिरपता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, बेळगाव तालुक्मयात मात्र पाणी जिरविण्यासाठी विविध तलावांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या तालुक्मयात 50 तलावांची निर्मिती करण्याची धडपड सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने पाहणी करून कौतुक केले आहे.

पाण्यासाठी अनेक गावांमध्ये भटकंती करावी लागत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी बेळगाव तालुक्मयात जोरदार प्रयत्न करत आहोत. याचबरोबर पुढील वर्षापर्यंत आम्ही अनेक तलावांना पुनरुज्जीवन करण्यासाठीचे काम हाती घेतले आहे. त्याची पाहणी करून तलावांमध्ये असणाऱया वृक्षांचे संगोपन करून ती तलावाभोवती लावल्यामुळे निसर्गरम्य वातावरण निर्माण झाल्याचेही यावेळी अधिकाऱयांनी केंदीय पथकाला दाखवून दिले. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आंबेवाडी ग्राम पंचायतीला भेट

आंबेवाडी ग्राम पंचायतलाही भेट देऊन तेथील कामगारांच्या अपेक्षा व इतर काही प्रश्न असतील तर ते सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायतीचे प्रकल्प अधिकारी रवी बंगारप्पण्णावर, ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील, तालुका पंचायतीचे साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद, साहाय्यक कार्यनिर्देशक अभियंते राजेंद्र होनकहंडे, पीडीओ हर्षवर्धन अगसर, तांत्रिक संयोजक नागेंद्र यरगुद्दी, प्रवीण बाणे, अक्षय चव्हाण, राठोड, ग्राम पंचायतीचे सेपेटरी प्रकाश पाटील, क्लार्क प्रणाली पाटील, कर्मचारी मारुती तरळे, कर वसुली अधिकारी प्रकाश व प्रदीप यांच्यासह इतर उपस्थित होते. 

Related Stories

डॉ. शिवबसव महास्वामीजींचा रविवारपासून जयंती महोत्सव

Amit Kulkarni

पल्स पोलिओ मोहिमेत राबलेले वेतन द्या

Omkar B

गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Amit Kulkarni

तलावात पडलेल्या वृद्धेला वाचविले

Amit Kulkarni

फुलविक्री बंदमुळे हिरावला रोजीरोटीचा सुगंध

Omkar B

हिंडलगा महालक्ष्मी यात्रोत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!