Tarun Bharat

केंद्रीय पथकाकडून हुक्केरी, गोकाक तालुक्याला भेट

प्रतिनिधी/ बेळगाव

पावसामुळे यावषीही विविध तालुक्मयांमध्ये पिकांना फटका बसला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी बेळगावात दाखल झाले. या पथकाने हुक्केरी, गोकाक तालुक्मयांना भेट देऊन पाहणी केली. पावसामुळे सोयाबिन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याची नोंद करण्यात आली. यावेळी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, माजी मंत्री शशिकांत नाईक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

यावषी झालेल्या दमदार पावसामुळे हिरण्यकेशी, कृष्णा, घटप्रभा, दूधगंगा, वेदगंगा नदीकाठांवरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चिकोडी, हुक्केरी या तालुक्मयांमध्येही मोठा फटका बसला आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला नुकसानीबाबतचा अहवाल पाठविला होता. त्याबाबत पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले.

या पथकाने सरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेऊन हुक्केरी तालुक्मयाला भेट दिली. सोयाबिन, मका तसेच इतर पिकांची पाहणी केली. बडकुंद्री गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱयांना दिली. दरवषीच नदीकाठांवरील गावांना फटका बसत आहे. तेव्हा नद्यांचे रुंदीकरण होणे गरजेचे असल्याचे मत माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, कृषी विभागाचे उपसंचालक एच. डी. कोळेकर, फलोत्पादन उपसंचालक रविंद्र हकाटी, प्रांताधिकारी अशोक तेली यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

बेळगावमधील राज्यस्तरीय स्पर्धेत बॅकस्ट्रोकमध्ये दोन नवे विक्रम

Amit Kulkarni

शुभम साखे यांच्या सायकल प्रवासाला सुरुवात

Patil_p

छ.शिवाजी उद्यान येथे गुढीपाडवा साजरा

Amit Kulkarni

कसाईखाना-शेडच्या लिलावाकडे व्यावसायिकांची पाठ

Amit Kulkarni

तालुक्मयातील शेतकऱयांवर पुन्हा कोसळली कुऱहाड

Omkar B

आनंद अकादमी, बीएससी ब संघ विजयी

Amit Kulkarni