Tarun Bharat

केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यातून तिघे प्रयत्नशील

Advertisements

लिंगायत कोटय़ातून कर्नाटकला प्रतिनिधित्व शक्य : केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची चर्चा

प्रतिनिधी / बेंगळूर

केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची चर्चा सुरू असतानाच राज्यातील खासदार शोभा करंदलाजे, पी. सी. गद्दिगौडर आणि शिवकुमार उदासी केंदीय मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाल्यास लिंगायत कोटय़ातून शिवकुमार उदासी किंवा पी. सी. गद्दिगौडर यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर महिला कोटय़ातून खासदार शोभा करंदलाजे हय़ा केंद्रीय मंत्री होतील, अशी चर्चा आहे.

लिंगायत कोटय़ातून केंद्रीय मंत्री झालेल्या दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात लिंगायत समुदायाचे प्रतिनिधित्त्व दिसत नाही. साहजिकच मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाल्यास बागलकोट लोकसभा मतदारसंघामधून चारवेळा विजय मिळविलेल्या पी. सी. गद्दिगौडर आणि हावेरी मतदारसंघातून तीनवेळा खासदार झालेल्या शिवकुमार उदासी यांच्यापैकी एकाला केंदीय मंत्रिमंडळात समावेश करून घेण्याबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. सध्या केंद्रात राज्यातून डी. व्ही. सदानंदगौडा आणि प्रल्हाद जोशी हे कॅबिनेट मंत्री आहेत.

कर्नाटकातील नेत्यांची फिल्डिंग?

सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे कर्नाटकने एका मंत्र्याला गमावल्यामुळे राज्यातीलच अन्य एका नेत्याची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. गेल्या दोन-चार दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकांमुळे केंद्रीय मंत्रिमंडळात बदल किंवा विस्तार होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय पातळीवर सुरू आहे.

Related Stories

कर्नाटक सरकार कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तात्पुरती हॉस्पिटल स्थापन करणार

Archana Banage

आगीमुळे तुरहळ्ळीचे पाच एकर जंगल जळून खाक

Archana Banage

कर्नाटक : पगारवाढीसाठी सरकारी डॉक्टर १५ सप्टेंबरपासून संपाच्या विचारात

Archana Banage

बेंगळूरमध्ये पहिल्या ई-बसचे अनावरण

Archana Banage

बेंगळूर: लग्न समारंभात बीबीएमपी मार्शल तैनात

Archana Banage

कर्नाटक: जेडीएसचा गोहत्या बंदी विधेयकास पूर्ण विरोध

Archana Banage
error: Content is protected !!