Tarun Bharat

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी ‘ते’ वृत्त चुकीचं ; पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम


सध्या देशभरात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या खासदार आणि भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रातील इतर काही इच्छुक नेत्यांसोबतच खासदार प्रीतम मुंडे देखील दिल्लीत दाखल झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं पंकजा मुंडे यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करुन हा संभ्रम दूर केला आहे. खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पहिली ती चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.भाजपने मराठा आणि ओबीस चा राजकारणातला चेहरा महाराष्ट्रातला देण्याचा प्रयत्न केलाय. तर महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे नारायण राणे मराठा समाजाचे नेते आणि कपिल पाटील आगरी समाजाचे तसंच वंजारी समाजाचे भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील राजीनामा दिला आहे. तसेच थावरचंद गेहलोत, रमेश पोखरियाल, सदानंद गौडा, संतोश गंगवार, देबर्षी चौधरी, रतनलाल कटारिया, प्रताप चंद्र सारंगी, अश्विनी चौबे यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Related Stories

नोंदणी तारखेपासून शिष्यवृत्ती द्या; सारथीच्या लाभार्थी संशोधक विद्यार्थ्यांची मागणी

Abhijeet Khandekar

पुलवामात 4 दहशतवाद्यांना घेरले

datta jadhav

नालासोपाऱ्यात 11 वर्ष जुनी इमारत कोसळली

Tousif Mujawar

महाराष्ट्राचे GST चे २४ हजार ३६० कोटी रुपये मिळावे ; अजित पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

Archana Banage

बब्बर खालसा इंटरनॅशनलचे दोन दहशतवादी अटकेत

datta jadhav

सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक पुन्हा कार्यान्वित

Patil_p
error: Content is protected !!