ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भात माहिती दिली.


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, आरोग्याबाबत येणाऱ्या तक्रारींमुळे मी माझी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी, कोरोना विषाणूची गंभीरता लक्षात घेऊन स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, गुर्जर यांच्या आधी मुख्यमंत्री बी एस येडिगुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची बाधा झाली होती. तर उत्तर प्रदेशातील कॅबिनेट मधील एकमेव महिला मंत्री कमल राणी वरुण यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.