Tarun Bharat

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या गोवा भेटीवर

पणजी/ प्रतिनिधी

       केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी सोमवार 1 नोव्हेंबर रोजी गोव्यात येणार आहेत. 1 व 2 नोव्हेंबर रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱयावर ते आहेत. एनएच- 566 वरील लोटली आणि वेर्णा आयडीसीमधील मिसिंग लिंकचे ते उद्घाटन करतील. तद्नंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील आणि टेलिमेडिसिन सेवांचे उद्घाटन करतील. संध्याकाळी दोनापावल येथील हॉटेल ताजमध्ये ‘गती शक्ती मास्टर प्लॅन’वर उद्योगपतींशी ते संवाद साधतील.

महामार्गाच्या कामांचा आढावा

        2 नोव्हेंबर रोजी क्रीडा खाते आणि दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी यांच्यामध्ये महत्त्वाच्या सामंजस्य करारावर केंद्रीय मंत्री गडकरी स्वाक्षरी करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची आणि महामार्गाच्या कामांचा आढावा घेणार आहेत. आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. 2 नोव्हेंबर रोजी गोव्यातून ते रवाना होतील.

Related Stories

साहित्यातून लोकमन जागृत करता येते

Patil_p

कुडचडे नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार ?

Amit Kulkarni

पर्वरीत 19 लाखांसह एटीएम मशिन लांबविले

Patil_p

महाराष्ट्रनंतर आता गोव्यातील दोन पंचातींमध्ये ‘विधवा सन्मान’

Amit Kulkarni

कचरा ‘ट्रान्सफर स्टेशन’ला आगीची पोलीस चौकशी व्हावी

Amit Kulkarni

…तर निसर्ग आम्हाला क्षमा करणार नाही

Omkar B