Tarun Bharat

केंद्रीय महिला बालविकास खात्याची आज गोव्यात बैठक

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

केंद्र सरकारच्या आठ वर्षांच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्याच्या उद्देशाने केंद्रीय महिला आणि बालविकास खात्यातर्फे आयोजित विशेष विभागीय बैठक आज दि. 12 जून रोजी गोव्यात होत आहे. गोवा, महाराष्ट्र, दादरा-नगरहवेली, दमण आणि दीव या राज्यांतील प्रतिनिधी या बैठकीत सहभाग घेणार आहेत.

महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱया या बैठकीस केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गोव्याचे महिला व बालविकास मंत्री विश्वजित राणे यांची उपस्थिती असेल. त्याशिवाय अनेक खासदार, विविध राज्यांचे समाज कल्याण मंत्री, महिला आणि बाल विकास मंत्री, खात्याचे प्रधान सचिव, रायपूर जिह्यातील आमदार, विविध राज्यांचे अन्य वरि÷ अधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य, जागतिक बँक यासह युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख या बैठकीत सहभागी होणार आहेत.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देश पुढील 25 वर्षांची उद्दिष्टय़े निश्चित करत असून  उज्ज्वल भविष्याकडे पाहत असताना अधिक चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातर्फे 4 जून पासून देशभरात विभागीय आणि उपविभागीय बैठकांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून आज दि. 12 रोजी गोव्यातील बैठक होणार आहे.

केवळ साध्य केलेले टप्पे साजरे करणे एवढेच या बैठकीचे ध्येय नसून महिला आणि बालकांना केंद्रस्थानी आणण्यासाठी अधिक प्रेरणा मिळविणे यावर विचार करणे हे ध्येय ठेवून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Stories

एका कुटुंबातील दोघांना भाजपची उमेदवारी नाही : सुभाष फळदेसाई

Omkar B

स्पॅम्प पेपर दरवाढ विधेयकास राज्यपालांनी मान्यता देऊ नये

tarunbharat

मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने घेतली वाहतूक संचालकाची भेट

Amit Kulkarni

कोळसा खाण, म्हादईवरून विधानसभेत गदारोळ

Amit Kulkarni

गणेशोत्सवासाठी बाजारपेठा फुलल्या

Amit Kulkarni

दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 19 लाखांचा ड्रग्ज जप्त

Patil_p
error: Content is protected !!