Tarun Bharat

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक”: प्रताप सरनाईक

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडीमधील नेत्यांची ईडी कडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर देखील ईडीनं छापा टाकला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीकडून ही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता. आत सरनाईक यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य असा वाद पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे सध्या ईडी चौकशी लावली आहे. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीकडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजप केंद्रात सत्तेत असल्यामुळे ईडीचा गैरवापर करुन ही कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. भाजप विरोधी पक्षतील नेत्यांना लक्ष करत आहे असे महाविकास आघाडीतील नेत्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईवर बोलतां त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात काही लोकांचा बळी जात आहे. यापैकी मी एक आहे असे वक्तव्य त्यांनी केलं आहे.

प्रताप सरनाईक एका पतर्कार परिषदेत बोलताना म्हणाले, “मी सुरवातीपासून सांगितलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये काही लोकांचा बळी जोतो त्यातला मी एक आहे. मात्र मला ईडीच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडून त्रास झाला नाही. ते त्यांचं काम करत आहेत.” प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या कारवाईला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमिवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Related Stories

कोरोनाच्या धास्तीने वटपौणिमा घरात साजरी

Patil_p

राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दापोलीतून याचिका

Abhijeet Shinde

आयोडीनच्या सौम्य द्रावणाने कोरोना विषाणूचा नाश; शास्त्रज्ञांचा दावा

datta jadhav

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील

Abhijeet Shinde

ताजिकिस्तानमध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप

datta jadhav

विकासकामांपेक्षा अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात सरकार व्यस्त

Patil_p
error: Content is protected !!